जिल्हा प्रशासन 'थुंकीमुक्त कोल्हापूर' चळवळीच्या भक्कमपणे पाठीशी : दौलत देसाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

देशात प्रथमच कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी अशी लोक चळवळ ऊभी राहिली आहे

कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या वाईट सवयीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी शहरात 'अँटी स्पिट मूव्हमेंट' ही चळवळ ऊभी राहिली. 

या चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आज निवेदन देत मागील चार महिन्यात राबवलेल्या जनजागृती मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली. 

यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, देशात प्रथमच कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी अशी लोक चळवळ ऊभी राहिली आहे. या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रश्न हाताळला जातोय हे विशेष आहे. 

तसेच यावेळी जनजागृती बरोबरच शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे थुंकीमुक्त क्षेत्र करण्याबाबत तसेच थुंकणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याबाबत सकारात्मक विचार झाला. जिल्हा प्रशासन या चळवळीच्या पाठीशी असेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली. तसेच शालेय स्तरावर मुलांच्यात हा विषय आधीपासूनच रुजवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण विभागाला या बाबतीत सूचीत केले जाईल असेही ते म्हणाले. 

हे पण वाचाGood News:कोल्हापूकरांनो कोव्हॅक्‍सिीन लस दाखल  

यावेळी दिपा शिपुरकर, राहुल राजशेखर,आनंद आगळगांवकर, प्रसाद नरुले, सागर बकरे, राहुल चौधरी व 'अँटी स्पिट मूव्हमेंट' चळवळीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clean kolhapur collector daulat desai