महास्वच्छता केली; कचरा जमा केला, 25 रोपे लावली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

कोल्हापूर  शहरात आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये पाच टन कचरा व प्लास्टिक जमा झाला.

कोल्हापूर : शहरात आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये पाच टन कचरा व प्लास्टिक जमा झाला. मोहिमेचा 62 वा रविवार असून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. 

आजच्या मोहिमेत नगरसेवक भूपाल शेटे, डी. वाय. पाटील स्कूल, बावडा, विवेकानंद कॉलेज विद्यार्थिनी मानसी कांबळे, सहायक आयुक्त चेतन कोंडे, अवधूत कुंभार, ज्येष्ठ नागरिक, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, आम आदमी अध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सर्वे, आदम शेख, महेश घोलपे, विशाल वाठारे, सचिन डाफळे, राज कोरगावकर, सुभाष यादव, बसाप्पा हदिमनी, सविराज पाटील, आनंदराव वणिरे, स्वच्छता दूत अमित देशपांडे, शेंडा पार्क परिसरातील भाजी विक्रेते यांनी भाग घेतला. 

जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर येथे राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, दसरा चौकतर्फे प्रतिनिधी महेश कामत यांनी 25 रोपे लावली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. शाहू उद्यान व धुण्याची चावी स्मृती उद्यान येथील परिसराची स्वच्छता करून येथे स्वरा फौंडेशनतर्फे नगरसेवक शेखर कुसाळे व प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. अध्यक्ष प्रमोद माजगावकर, महिला अध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, करवीर अध्यक्ष नागेश कुंभार, अपूर्वा खांडेकर, प्रणव कागले, नेहा कौदाडे, पियुष हुलस्वार, पिंटू संकपाळ, सरफराज मिद्या, धर्मराज पडळकर, आदित्य पाटील, संतोष पाटील, रेणू कोकाटे, एैश्‍वर्या मोरे उपस्थित होते. 

हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज मेनरोड, पंचगंगा नदी घाट, पंचगंगा स्मशानभूमी ते सिध्दार्थ नगर, जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर, रंकाळा तलाव पद्माराजे उद्यान मेनरोड, रिलायन्स मॉल मागील बाजू जयंती नदी, शिये नाका मेनरोड तसेच राजकपूर पुतळा ते रंकाळा इरानी खण, शेंडा पार्क येथ स्वच्छता केली. 

झूम प्रकल्प परिसरात वृक्षारोपण 
गुरुपौर्णिमेच्यानिमित्त निसर्गालाच गुरू मानून कसबा बावडा झूम प्रकल्प परिसरात हवा शुद्ध ठेवणारी विषारी वायू शोषून घेणारी 15 ते 20 फुटी झाडांचे वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेकडून वृक्षारोपण केले. यात महारुख, तामण, पुत्रंजीवी, सातवीन, कडूलिंब, जांभूळ, वड, पिंपळ, हेळा, सोनचाफा, बिट्टी, मोर आवळा, करंज, बेल अशा देशी झाडांचा समावेश होता. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, वृक्षप्रेमी संस्थेचे सदस्य, पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, सतीश कोरडे, तन्वी भोसले, परितोष उरकुडे, सचिन पोवार, विकास कोंडेकर, नागरिकांचा सहभाग होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleansed; Garbage collected