आता मिळणार स्वस्त दरात चोवीस तास वीज ; ही आहे योजना

CM Solar Agriculture Channel Scheme supported by a people in village kolhapur
CM Solar Agriculture Channel Scheme supported by a people in village kolhapur
Updated on: 

आजरा (कोल्हापूर) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला आजरा तालुक्‍यात प्रतिसाद मिळत आहे. दीड वर्ष हालचाली सुरु असून पेरणोली व पोळगाव या ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले आहेत. या ग्रामपंचायतींनी सुचविलेल्या जागेची पाहणी महिन्याभरापूर्वी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधीकडून झाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर कार्यवाहीला सुरवात होणार आहे. प्रदूषणविरहित व स्वस्त दरात वीज मिळणार असल्याने भविष्यात तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायती पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

ऊर्जेचा तुटवडा दूर करण्यासाठी अपारंपरिक स्रोत तपासले जात आहेत. यात सौर ऊर्जा हा पर्याय समोर आला आहे. जलविद्युत, औष्णिक, अणुऊर्जा व अन्य स्रोतांना मर्यादा येतात त्यामुळे सौर ऊर्जेचा पर्याय पुढे येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला सुरवात झाली आहे. यातून कृषी पंपांना वीजपुरवठा केला जाणार आहे. 

दरम्यान, आजरा तालुक्‍यात वीज वितरण कंपनीने गवसे, पोळगाव, पेरणोली, उत्तूर, शेळप या ग्रामपंचायतींना पत्र दिले आहे. त्यात पेरणोली व पोळगाव या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी दहा एकर जमीन उपलब्ध असल्याचे सांगून प्रस्ताव दिले आहेत. त्या जागेची पाहणी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व सौर कंपनीच्या प्रतिनिधींनी केली आहे. काही तांत्रिक अडचणी पुढे आल्या आहेत. त्या दूर करून कार्यवाहीला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

"आजरा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात वन्यप्राण्यांकडून हल्ले होत असल्याने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्याला सौर ऊर्जा हा पर्याय आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वस्त दरात चोवीस तास वीज उपलब्ध होईल." 

- दयानंद कमतगी, उपकार्यकारी अभियंता, आजरा.          

दृष्टिक्षेपात

- कमीत कमी २० एकर जमीन उपलब्ध झाल्यास चार मेगावॉटचा प्रकल्प उभा राहू शकतो. 
- पाचशे ते सहाशे कृषी पंपांना वीजपुरवठा 
- १० ते १२ गावांतील कृषी पंपांसाठीची विजेची गरज पूर्ण 
- कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा होऊ शकतो.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com