कोळशाने भरलेल्या ट्रकला लागली आग...

Coal truck caught fire near koni toll naka
Coal truck caught fire near koni toll naka

कोल्हापूर - पुणे - बंगळूर महामार्गावरील किणी (ता.हातकणंगले) येथील पथकर नाक्यानजीक कोळसा भरलेल्या ट्रक मधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - चित्रदुर्गवरुन कोळसा भरून ट्रक (के.ए.०६-ए.ए.३०२९) मुंबईकडे निघाला होता.किणी (ता.हातकणंगले) येथील किणी पथकरनाक्याजवळ आला असता या ट्रकच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे चालकाला निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबविला. याची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या कर्मचाऱ्यांनी अग्निशमनदल व जे.सी.बीच्या सहाय्याने आग विझवण्यात यश मिळविले.यामुळे मोठे नुकसान टळले.जळालेला कोळसा अन्य वाहनात जेसीबीच्या सहाय्याने भरण्यात आला.सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com