जिल्हाधिकारी धावले अॅम्बुलन्स आणि पोलिसांसह

 The collector ran with an ambulance and police
The collector ran with an ambulance and police

चंदगड ः मिरवेल (ता. चंदगड) येथे दरड कोसळली असून एकाचा मृत्यू झाल्याचा संदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रांत, तहसीलदार, स्वयंसेवकांना दिल्या. संततधार पावसाची तमा न करता पथक तातडीने तयार झाले. ऍम्ब्युलन्स, पोलिस फाट्यासह सर्वजण मिरवेल परिसरात पोहोचले; परंतु तसे काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाला कोणीतरी चुकीचा संदेश दिल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ झाली. 
पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळत होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणावरे यांच्यासह आपदा मित्रांना ही माहिती दिली. एक जण मृत असल्याचे कळाल्यामुळे घटनेचे गांभीर्य मोठे होते. पारगड किल्याच्या पायथ्याचा हा परिसर दुर्गम असल्यामुळे पोलिसांसह ऍम्ब्युलन्सही सोबत घेण्यात आली. तातडीने पथक मिरवेल परिसरात पोहोचले; परंतु परीसरात असा कोप्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिकांनीही याला दुजोरा दिला. पंधरा दिवसांपूर्वी दरड कोसळली आहे; परंतु नुकसान नाही. तरीही अधिकाऱ्यांनी फिरून खात्री करुन घेतली. अखेर ती अफवाच ठरल्यान ेसर्वजण माघारी परतले. 

जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता.... 
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी दौलत देसाई तत्परतेने चंदगडच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी प्रांताधिकारी पांगारकर मिरवेल परिसरात पोहोचल्या होत्या. अफवा असल्याचे त्यांनी कळवले. तोपर्यंत देसाई चंदगडमध्ये पोहचले होते. थोडा वेळ तहसील कार्यालयात थांबून ते पुन्हा कोल्हापूरला परतले.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com