दिलासादायक ः कोरोना रूग्णांसाठी आदमापूर भक्त निवासमध्ये 200 बेड सज्ज

धनाजी आरडे
Wednesday, 5 August 2020

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा भक्त निवासमध्ये तालुक्‍यातील दुसरे कोविड काळजी सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी दोनशे बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. 

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा भक्त निवासमध्ये तालुक्‍यातील दुसरे कोविड काळजी सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी दोनशे बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. 
दोन दिवसांपूर्वी हे कोविड सेंटर कार्यरत झाले असून दोन महिला व दोन लहान मुले असे चार रुग्ण येथे उपचार घेत आहेत. संभाव्य रुग्ण संख्येतील वाढ लक्षात घेऊन येथे व्यवस्था उभी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार अमोल कदम यांनी भेटीप्रसंगी सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना केली. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आवश्‍यक सर्व साहित्य येथे उपलब्ध असून भक्त निवास परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्‍यक डॉक्‍टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तसेच इतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfortable: 200 beds ready in Adamapur Bhakt Niwas for Corona patients