
बेळगाव - चव्हाट गल्ली शाळेच्या जागेच्या विक्री प्रकरणी आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. महम्मदगौस मोकाशी यानी 7 जानेवारी रोजीच नऊ जणांच्या विरोधात येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयात खासगी तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. 8 नोव्हेंबर रोजी मोकाशी यांनी चव्हाट गल्लीतील शाळेच्या जागेची विक्री केली. पण त्यानंतर दोन महिन्यातच वटमुख्त्यारपत्रधारक, खरेदीदार व साक्षीदार यांच्याशी त्यांचे वितुष्ट आले. त्यामुळेच त्यानी नऊ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. न्यायालायाने ती तक्रार दाखल करून घेवून मार्केट पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. पण या व्यवहारात नेमके वितुष्ट का आले? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिवाय मोकाशी यांनी ज्याना विनायक माने यांना वटमुख्त्यारपत्र दिले होते, त्यांच्या विरोधातही तक्रार केली? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
9 जानेवारी रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेने तक्रार दाखल करण्यास दोन महिन्यांचा विलंब लावला. पण मोकाशी यानी त्याआधीच थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानी वटमुख्त्यारपत्रधारक विनायक माने, जागेचे खरेदीदार जयगौडा पाटील, ऍड. शांतीनाथ राऊळ, एक्संबा येथील बिरेश्वर पतसंस्थेचे रविंद्र चौगुला, संकेश्वर येथील दस्तगीर देसाई व अयुब मनियार, कंग्राळी येथील योगेश पाटील, महांतेशनगर येथील सुनिल पाटील व एक्संबा येथील बहाद्दूर गुरव यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वस्तुतः 8 नोव्हेंबर रोजी जयगौडा पाटील यानी या जागेची खरेदी केल्यानंतर त्याच जागेचा विक्री करार त्यांनी बिरेश्वर पतसंस्थेसोबत केला होता. पण नंतर या व्यवहारावरून मोकाशी व वरील नऊ जणांमध्ये मतभेद झाल्याचे निदर्शनास येते.
न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत मोकाशी यानी चव्हाट गल्लीतील शाळेच्या जागेचे आपण मालक असल्याचे नमूद केले आहे. संपूर्ण 3 एकर 35 गुंठे जागा आपल्या मालकीची आहे असा त्यांचा दावा आहे. मोकाशी यानी या जागेसंदर्भात महापालिका व त्यांच्यात झालेल्या व सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याची माहिती सविस्तर दिली आहे. शिवाय न्यायालयीन लढा सुरू असताना बोगस वटमुख्त्यारपत्र व बोगस दस्त तयार करून जागेची विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. वटमुख्त्यारपत्रावर तसेच खरेदीदस्तावर व विक्री करारावर साक्षीदार म्हणून सही केलेल्यांच्या विरोधातही मोकाशी यानी तक्रार दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने सर्व म्हणजे नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे. जयगौडा यांच्यासोबत झालेला व्यवहार व जयगौडा पाटील यांनी बिरेश्वर पतसंस्थेसोबत केलेला व्यवहार दोन्ही बेकायदेशीर असल्याचाही दावा मोकाशी यानी केला आहे. त्यामुळे आता दस्त व विक्री करार दोन्ही रद्द होणार का? हे पहावे लागणार आहे.
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.