कॉंग्रेसचे दिग्गज नेते आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी

congress leader h k patil met mla prakash awade
congress leader h k patil met mla prakash awade

इचलकरंजी - कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी आज अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. गेल्या दोन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध असल्याचा दाखला देत ही भेट राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट असल्याची श्री.पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र आमदार आवाडे यांच्या कॉंग्रेस पक्ष प्रवेश करणार काय, या विषयावरील चर्चेने ही भेट लक्षवेधी ठरली. दरम्यान, या भेटीच्या निमित्ताने आवाडे यांना स्वगृही परतण्याबाबत श्री.पाटील यांनी निमंत्रण दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार आवाडे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. कधी कॉंग्रेस तर कधी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. कांही दिवसांपूर्वी आवाडे यांनी कॉंग्रेस प्रभारी पाटील यांची कर्नाटकात भेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या भेटीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. या भेटी दरम्यान कोणत्या राजकीय घडामोडी होणार काय याची उत्सुकता होती. तथापि, या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात असले तरी आवाडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्वाची समजण्यात येत आहे. 

एका नातेवाईकाच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने श्री.पाटील येथे आज आले होते. त्यानंतर त्यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आवाडे यांच्यावतीने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. याप्रसंगी पालक मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, कॉंग्रेसचे आमदार पी.एन. पाटील, राजू आवळे, जयंत आसगांवकर, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थीत होते. यावेळी कौटुंबिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या चर्चे दरम्यान आवाडे यांना कॉंग्रेसमध्ये येण्याबाबत निमंत्रण दिल्याची चर्चा आहे. मात्र त्याला श्री.पाटील यांनी नकार दिला. पत्रकारांशी बोलतांना श्री. पाटील यांनी आवाडे यांच्याशी दोन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे आपण ही सदिच्छा भेट दिली असून त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगतिले. याप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे आदी उपस्थीत होते
 
  पक्षप्रवेशावरुन कार्यकर्ते गोंधळात
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी पाटील यांच्यासह कॉंग्रेस आमदारांची फौज आज आवाडे यांच्या निवासस्थानी आली होती. त्यामुळे एकिकडे आवाडे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार काय याची चर्चा सुरु असतांनाच आवाडे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही दुसरीकडे सुरु झाली होती. त्यामुळे आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाच्या विषयावरुन कार्यकर्तेही आता संभ्रमात पडले आहेत. 


 
भारत बंदला कॉंग्रेसचा पाठिंबा ; पाटील

  केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी विषयक कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी न्याय आहे. त्यामुळे उद्या (मंगळवार) शेतकऱ्यांनी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला कॉंग्रेसने सक्रीय पाठिंबा व्यक्त केला आहे, असे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. 

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूकीमध्ये मिळविलेल्या यशामुळे कॉंग्रेस अधिक बळकत होत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने नुकतीच वर्षपूर्ती केली आहे. या सरकारच्या चांगल्या कामगिरीमुळेच निवडणूकीत यश मिळाले आहे. भविष्यात कॉंग्रेस अधिक सक्षम होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com