"गोकुळ', "केडीसी'त घुमशान ; निवडणुकीचा बिगुल वाजला

cooperative society election kolhapur political news gokul ddc election
cooperative society election kolhapur political news gokul ddc election

कोल्हापूर - दोन आठवड्यापूर्वी 31 मार्च 2021 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकीला दिलेली स्थगिती आज शासनाने उठवली. ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया स्थगित आहे, तेथून पुढे ती पुन्हा सुरू करण्याचे आदेश आज काढण्यात आले. सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबतचा शासन पातळीवरील हा सावळागोंधळ पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्यावर्षी मार्च महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा तीन महिन्यांची स्थगिती दिली होती. त्यानंतर तब्बल चारवेळा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 31 डिसेंबर ही स्थगितीची अंतिम मुदत होती. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले, त्यानुसार जिल्हा बॅंकेची प्रक्रियाही सुरू झाली होती, पण तोपर्यंत 16 जानेवारी रोजी पुन्हा या निवडणुकांना 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा हा एप्रिल-मेमध्येच उडेल असे वाटत असतानाच पुन्हा शासनाने आज या निवडणुकीवरील स्धगिती उठवत असल्याचे जाहीर केले. 

यावेळी या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी होत असल्याचे कारण देण्यात आले आहे. विधान परिषद, ग्रामपंचायती होतात तर मग सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती का ? अशी विचारणा आमदार व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागल्याने त्यांची ही मागणी विचारात घेऊन या निवडणुकांवरील स्थगिती उठवत असल्याचे या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे. यासंदर्भात 16 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आलेले आदेश रद्द करून ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबली आहे तेथून ती पुढे चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी हे आदेश काढले. 
  
"गोकुळ', "केडीसी' त घुमशान 
जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या "गोकुळ' व "केडीसी' बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेला या आदेशाने सुरूवात होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार असून पालकमंत्री सतेज पाटील विरूध्द माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्यातील राजकीय सामना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या दोन संस्थांचे राजकारण एकमेकाला पूरक असल्याने "गोकुळ' च्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भुमिका काय राहील यावर जिल्हा बॅंकेसह जिल्ह्यातील राजकीय चित्र अवलंबून रहाणार आहे. उद्याच (ता. 3) "गोकुळ' ची वार्षिक सभा असून त्यातही या निवडणुकीचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. 

हे पण वाचा - यंदाचा महापौर शिवसेनेचाच ; आता पुर्ण तयारीनिशी मैदानात  
 
"राजाराम' मध्ये चढाओढ 
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडीक यांची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात पालकमंत्री पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्री. पाटील यांच्या गटामार्फत गावोगांवी संपर्क मेळावे सुरू आहेत. या कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी या दोन तुल्यबळ नेत्यांतील चढाओढ पहायला मिळणार आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com