कोरोनाच्या महामारीत जुगाऱ्यांच्या खिशात खुळखुळाट

Corona epidemic gamblers pocket
Corona epidemic gamblers pocket

कोल्हापूर ः कंदलगाव रोडवरील केएमटी कॉलनीत बंद खोलीत सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने छापा टाकला. अड्ड्यातील 17 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोकडसह पावणे दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः बाबासो विठ्ठल पुजारी (वाशी ता. करवीर), धुलेंद्र नवनाथ पवार (रामानंदनगर), नंदकुमार रामचंद्र गायकवाड, (महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ), सदांनद महादेव पाडळकर (पाडळकर वसाहत, हॉकी स्टेडियमजवळ), बादशहा नबीसाब शेख (रंकाळा टॉवर), किरण अनंत गवळी (मंगळवार पेठ), श्रावण दत्तू भालकर (भारती विद्यापीठ परिसर), प्रसाद रामचंद्र भोरे (सुभाषनगर), सागर संभाजी पाडळकर (पाडळकर कॉलनी, हॉकी स्टेडियमजवळ) मोनेश्री भिमाण्णा पाटील (कंदलगाव), मिलिंद मारुती गुरव (कळंबा), उत्तम रघुनाथ भोसले (जुना बुधवार पेठ), कमलेश पूनमचंद ओसवाल (भक्तिपूजानगर), संतोष विठृल आडनाईक, (मंगळवार पेठ), अभिजित राजेंद्र पोवार (कंदलगाव), हरिष राजेंद्र ओसवाल (प्रतिभानगर), संदीप सदाशिव इंगवले (केएमटी कॉलनी, कंदलगाव रोड)

पोलिसांनी दिलेली माहिती, करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांना कंदलगाव रोडवरील केएमटी कॉलनीतील बंद खोलीत पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकून 15 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ही खोली संदीप इंगवलेची असून, जुगार अड्डामालक हरिष ओसवाल असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानुसार 17 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 9 हजार 630 रोकड, 14 मोबाईल संच, फर्निचर, चार मोटारसायकल असा 1 लाख 88 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोरोना संसर्गकाळात या सर्वांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नव्हते. संबंधितांवर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

संपादन - रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com