
कोल्हापूर : बालकांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक लसी दिल्या जातात. भविष्यात गंभीर आजारांपासून या बालकांचे रक्षण होऊन त्यांचे आयुष्य निरोगी राहावे, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने लसीकरणाची मोहीम राबवत असतो. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त मुलांना व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु, कोरोना महामारीचा फटका बालकांच्या लसीकरणावर झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
लसीकरणासाठी खात्रीशीर समजल्या जाणाऱ्या ग्रामीण आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्या दवाखान्यांमधील रांगा कोरोना काळात गायब झाल्या. एकीकडे कोरोनावर एखादी लस आली तर किती बरे होईल, अशी अपेक्षा तर दुसरीकडे इतर आजारांपासून बाळाला सुरक्षित ठेवणारी लस देण्यासाठी बाळाला बाहेर न्यायचे कसे? असा प्रश्न पालकांपुढे उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या लॉकडाऊन व कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळे जिल्ह्यात राबवण्यात येणारी लसीकरण मोहिम विस्कळीत झाली. मे-जून महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला.
वंचित बालकांचा शोध
कोरोना संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्रात लसीकरणाचे सत्रे आयोजित करण्यावर मर्यादा येत होत्या. तसेच महामारीच्या काळात बालकांना घेऊन लसीकरणाला कसे जायचे? अशी भीती पालकांच्या मनात आहे. यामुळे अनेक बालके लसीकरणापासून वंचित राहिली. यामुळे बालकांना विविध आजारांना पुढे सामोरे जावे लागू शकते म्हणून ग्रामीण व महानगरपालिका आरोग्य यंत्रणेकडून या बालकांचा शोध घेत लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदिर, छोटे हॉल, अंगणवाडी या ठिकाणी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात येत आहे. या ठिकाणी मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशी खबरदारी यंत्रणा घेत आहे. त्यामुळे सध्या बरेच पालक बालकांना लसीकरणासाठी घेऊनही जात आहेत.
म्हणून लसीकरण आवश्यक...
लसीकरणाने बाळाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविली जाते. लसीमुळे नैसर्गिक ॲण्टिबॉडीज वाढतात. जेव्हा बाळास जंतूचा संसर्ग होतो तेव्हा या ॲण्टिबॉडीज जंतूचा नायनाट करतात. लहान मुलांचे कर्दनकाळ असलेले घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ हे सहा रोग प्रतिबंधक लस दिल्याने टाळता येतात. त्यामुळे लसीकरण पूर्ण करुन घेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे.
लसीकरण करून घ्यावे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे तसेच शहरातही सुरक्षेची काळजी घेत लसीकरण सत्राचे आयोजन यंत्रणा करत आहे.
- डॉ. फारूख देसाई, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी
कोरोना काळातील लसीकरण सत्रे
एप्रिल - १५६७
मे - १४६६
जुन - १५५३
जुलै - १४४६
ऑगस्ट - १३९२
मार्च महिना अखेर ४३६०८ बालकांचे लसीकरण झाले.
जुलै महिना अखेर १३५५५ बालकांचे लसीकरण झाले.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.