कोल्हापूर ; 'त्या' डाॅक्टरांचा कोरोना अहवाल येताच संपर्कातील लोकांचा शोध सुरू 

corona infection for doctors in kolhapur nagaon
corona infection for doctors in kolhapur nagaon

कोल्हापूर : नागाव (ता. हातकणंगले ) येथील एका डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डाॅ. आंबेडकर नगर आणि माळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरांनी स्वतःमध्ये लक्षणे ओळखून स्वतःहून विलगीकरण करून घेत स्वॅब तपासणीसाठी दिला होता. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वप्रथम गावातील डॉक्टर राहत असणारे माळवाडी ( शिवाजीनगर ) येथील त्यांचे निवासस्थान, क्लीनिक व परिसर बंद करण्यात आला. त्यानंतर आंबेडकर नगर येथील दवाखाना व परिसर बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अरुण माळी यांनी सांगितले. 

परिसरात औषध फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान डॉक्टरांच्या नागाव येथील क्लिनिक व आंबेडकर नगर येथील दवाखान्यात गेल्या तीन दिवसात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे व डॉक्टरांनी काही रुग्णांच्या घरी भेटी देऊन रुग्णांची तपासणी केली होती. अशा सर्वांची यादी बनविण्याचे काम सुरू असून डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब  तपासणीसाठी देण्यात येणार आहेत.


हातकणंगल्यात माजी सरपंचांसह पत्नीलाही कोरोनाची लागण 
 भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासून आजवर हातकणंगलेतील एकही जण कोरोना बाधित रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे सर्वत्र फिलगुडचे वातावरण होते. मात्र आज येथील एका माजी सरपंचासह त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हातकणंगले उद्यापासून चार दिवस लॉकडाऊन ठेवण्यात येणार होते. मात्र या घटनेनंतर आजपासूनच शहर पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले असून पाच तिकटी परिसर आणि अंतर्गत रस्ते सील करण्यात आले आहेत.

संबंधित माजी सरपंच एका कारखान्यांत अभियंता  म्हणून नोकरीस आहेत. त्या कारखान्याशी संबंधित काही जणांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे यातूनच हे कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या मंगळवारी त्यांना प्रचंड ताप आल्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून औषधे घेतली होती. त्यामुळे दोन दिवस कमी आलेला ताप परत वाढू लागला. शिवाय प्रकृती अस्वस्य वाटू लागल्याने त्यांना उपचारार्थ कोल्हापूरांतील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. तरीही प्रकृतित अपेक्षित सुधारणा होत नसल्याने सोमवारी पती, पत्नी दोघांचे स्वॅब तपासणीसाठी दिले होते. आज सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  

यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून नगराध्यक्ष अरुण जानवेकर, उपनगराध्यक्ष रणजित  धनगर, मुख्याधिकारी योगेश कदम, डीवायएसपी प्रणिल गिल्डा आदींनी परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सबंधित रुग्णांशी थेट संपर्कात असलेल्या वीस जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यांत आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यांत आले आहेत.  

संबंधित माजी सरपंचाचा पुतण्या घरातच खासगी क्लास घेत असून या क्लासला रोज २५ हून अधिक लहान मुले येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्लासेसना बंदी असताना घरात क्लास कसे चालवले जातात? यातील कोणाला लागण झाली तर जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे.

परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊनच उद्यापासून चार दिवस हातकणंगले लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. याला काही व्यापारांचा विरोध होता. मात्र आज गावातच रूग्ण सापडल्याने हा निर्णय योग्यच होता हे स्पष्ट झाले आहे.

-रणजित धनगर,  उपनगराध्यक्ष. हातकणंगले 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com