कोल्हापूर - विद्यमान आमदारांना कोरोनाची बाधा

corona infection to ichalkaranji mla
corona infection to ichalkaranji mla

कोल्हापूर -  विद्यमान आमदारांना कोरोनाची बाधा 
इचलकरंजी : कोरोनाचा शहरात कहर सुरूच असून आमदार प्रकाश आवाडे यांना आज संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आपली प्रकृती ठिक असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून तपासणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.


दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्यासह अन्य दोन नातेवाईक पॉझिटीव्ह आले होते. त्यावेळी आमदार आवाडे यांनी रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करून घेतली होती. त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे अाढळून आल्यामुळे आपला स्वॅब तपासणीसाठी दिला. त्याचा अहवाल आज दुपारी पॉझिटीव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

आपली प्रकृती ठिक असून खबरदारी म्हणून गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

दरम्यान, आमदार आवाडे हे शासकीय कार्यालयासह अन्य काही ठिकाणी बैठकींना तसेच कार्यक्रमांना उपस्थीत होते. त्यामुळे त्यांच्या तीव्र संपर्कात अनेकजण आले आहेत. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

यापूर्वीही त्यांच्या कुटूंबातील तिघेजण पॉझिटीव्ह आले होते. उपचारानंतर ते तिघेही कोरोनामुक्त झाले होते. आता आमदार आवाडे यांच्यासह कुटूंबातील आणखी चौघेजण बाधीत झाले आहेत. त्यातील तिघांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. पोलीस अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, शासकीय अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल १५०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता शासनाच्या वरिष्ठ पातळीवरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.


"कोरोनाची सुरूवातीची लक्षणे आढळल्यानंतर माझी चाचणी घेण्यात आली असून माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. माझी प्रकृती ठिक आहे. परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून तपासणी करून घ्यावी."

-आमदार प्रकाश आवाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com