कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये 'ही' बातमी समजली अन् उडाली खळबळ...

corona positive Husband of female employee in kolhapur zp
corona positive Husband of female employee in kolhapur zp
Updated on

कोल्हापूर - जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे ऑफिस आज सकाळी दहा वाजताच बंद करण्यात आले. या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या कार्यालयात एकूण 35 कर्मचारी आहेत. ही वार्ता जिल्हा परिषदेत समजताच एकच खळबळ उडाली. सर्व विभागांनी प्रवेशद्वारातच अभ्यागतांना अटकाव केला आहे.

शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेत लगबग सुरू झाली होती. सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेतील कार्यालय उघडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर कागलकर हाऊस ही इमारत आहे. याठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध विभागांची कार्यालये आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सर्व कर्मचारी कार्यालयात दाखल झाले.त्याचवेळी या विभागातील एक महिला कर्मचाऱ्याचा पती रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. संबंधित महिला कर्मचाऱ्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. या अहवालाकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com