बेळगाव जिल्ह्यात चौघे कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण रुग्ण 139

Corona positive patient found in belgum district
Corona positive patient found in belgum district



बेळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा परत शिरकाव झाला. आणखी चौघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज (ता.27) निदान झाले. यामध्ये 2 वर्षाच्या बालिकेचाही समावेश आहे. केरळहून सहकुटुंब बालिका मे दुसऱ्या आठवड्यात बेळगावला आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 139 वर पोचली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या दीड शतकाच्या उंबरड्यावर पोचली आहे.

हंदिगनूर शाळेत होते क्वारंटाईन

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढते आहे. 24 तासात 122 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. बेळगाव शहर, हंदिगनूरला क्वारंटाईन होते. कोरोना चाचणी केली. वैद्यकीय तपासणीत चौघांना कोरोना झाल्याचे निदान झाले. यापैकी दोन वर्षाची बालिका कोरोनाबाधित आढळली आहे. कोरोना कक्षात तिला दाखल केले आहे. तसेच महाराष्ट्र मुंबई शहरातील दोघे स्थलांतर मजूर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांचे अनुक्रमे वय 37, 32 आहे. आरोग्य विभागातर्फे यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार दोघे स्थलांतर मजूर आहेत. मे महिन्यांत दुसऱ्या आठवड्यात बेळगावला आले. हंदिगनूर शाळेत क्वारंटाईन होते. कोरोना झाल्याबाबत निदान झाले आहे. दिल्लीहून आलेल्या एकाला कोरोना झाला. मे दुसऱ्या आठवड्यात बेळगावात आल्यानंतर क्वारंटाईन होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचे वय 28 आहे. चौघांनाही जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात दाखल केले आहे.

मंगळवारी 13 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामध्ये आज चौघांची भर पडली. त्यामुळे दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात 17 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 139 वर पोचला आहे. त्यापैकी डिस्चार्ज रुग्णांची संख्या 94 आहे. मृत्यू एकाचा झाला. उपचार घेणाऱ्यांची संख्या 44 आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com