कहर थांबेना ! कोल्हापुरात आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रयोगशाळेतून 9 तसेच एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रयोग शाळांकडून 5 अहवाल अवघ्या काही मिनिटांपूर्वी प्राप्त झाले आहेत.

कोल्हापूर - आज दुपारी आलेल्या अहवाला नुसार एकूण चौदा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या 274 इतकी झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रयोगशाळेतून 9 तसेच एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रयोग शाळांकडून 5 अहवाल अवघ्या काही मिनिटांपूर्वी प्राप्त झाले आहेत. अजूनही जवळपास दोन हजाराहून अधिक स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. टप्प्याटप्प्याने त्याची तपासणी होत असून सायंकाळपर्यंत तसेच रात्री उशिरापर्यंत दोन टप्प्यात आणखी काही अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in kolhapur

टॅग्स
टॉपिकस