esakal | मुंबई, पुण्यातुन लोकांचे लोंढे कोल्हापूरकडे ;संसर्ग वाढण्याची भीती, प्रवासपूर्व चाचणीची गरज

बोलून बातमी शोधा

corona testing increased in kolhapur pune mumbai people come in city dangerous

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर 10 टक्केच्या आत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा कोरोना तपासण्या केल्यानंतर 1 रुग्ण आढळतो.

मुंबई, पुण्यातुन लोकांचे लोंढे कोल्हापूरकडे ;संसर्ग वाढण्याची भीती, प्रवासपूर्व चाचणीची गरज
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : राज्यात शनिवार व रविवारच्या लॉकडाऊननंतर आणखी कडक लॉकडाऊन होईल, या भितीने पुणे, मुंबई, ठाणेसह इतर जिल्ह्यात असणारे कोल्हापुरातील लोक मोठ्या प्रमाणात स्वगृही परतत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रुग्ण संख्या झपाटण्याने वाढणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांची प्रवासपूर्व तपासणी गरजेची असल्याचे चित्र आहे. ज्यांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आहे, असा व्यक्ती घरी राहिल. पण, जो कोरोना पॉझिटिव्ह आहे. तो दवाखान्यात उपचार घेईल. यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा होणारा विस्फोट कमी होण्यास मदत होणार आहे. 

राज्य शासनानाकडून गेल्या आठवड्यातील जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबई, पुणे आणि ठाणे सारख्या मोठ्या शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दर 35 ते 40 टक्के आहे. सध्या यामध्ये टक्केवारीत दिवसेंदिवस वाढच होत आहेत. या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर 10 टक्केच्या आत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा कोरोना तपासण्या केल्यानंतर 1 रुग्ण आढळतो. राज्यात 10 टक्‍के रुग्ण सख्या वाढीच्या दर असणारे असे सहा जिल्हे आहेत. 

गेल्यावर्षी लाकडाऊन आणि उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे अडीच लाख ते 3 लाख लोकांनी स्थलांतर केले. गेल्यावर्षी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाला पास दिला जात होता. याशिवाय, त्यांची शंभर टक्के तपासणी केली जात होती. यावर्षीही त्याहून अधिक भयानक परिस्थिती समोर दिसत आहे. तरीही, कोणतीही तपासणी किंवा चाचणी केली जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे. 

हेही वाचा - राज्यात सरकारची लॉकडाउनची तयारी; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा काय लिहिलंय?

बाहेरुन येणाऱ्यांना सक्तीने तपासणी किंवा त्यांची चाचणी करुनच जिल्ह्यात प्रवेश देणे शहरी आणि ग्रामीण भागाला फायद्याचे ठरणार आहे. कोल्हापूरमध्ये येण्याआधी एखाद्याने आपआपल्या गावी जाण्याआधीच कोरोना तपासणी केली किंवा लसीकरण केल्यानंतर चार आठवड्याने प्रवास केल्यास कोरोना संसर्गाला निश्‍चितपणे आळा बसणार आहे. शासनानेही ही बाब आता मनावर घ्यावी लागणार आहे. 

 यासाठी हवी तपासणी : 


- मुंबई, ठोणे शहरातून इतर शहरात लोकांचे स्थलांतरण होत आहे. 
- ज्या शहरात कोरोना रुग्ण वाढीचा दर जास्त आहे, तेथील लोक कोल्हापूरमध्ये येत आहेत.
- ज्या ठिकाणाहून लोक येत आहेत, त्या ठिकाणी तपासणीसाठी मोठ्या प्रयोगशाळा व यंत्रणा तयार आहे.
- मोठ्या शहरात तपासणीमध्ये एखादा व्यक्ति पॉझिटिव्ह आल्यास मोठी रुग्णालये, व्हेंटिलेटर, डॉक्‍टर्स व इतर यंत्रणा सक्षम आहे. 
- शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम आहे.
- औषध पूरवठा अपेक्षीत होवू शकतो. 

 प्रवासपूर्वी तपासणी फायदेची ठरणार : 


- मोठ्या शहरातून राज्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रसार रोखता येईल.
- वेळीच तपासणी केल्याने त्वरीत उपचार घेता येईल, मृत्यू दर कमी होईल. 
- पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तिचे कुटूंब सुरक्षित राहिल. 
- ग्रामीण भागातील यंत्रणा वैद्यकीय यंत्रणा स्थानिक रुग्णांवर प्रभावी उपचार करेल. 
- एकाव्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे, एका घरातून दुसऱ्या घरात, एका कुटूंबाकडून दुसऱ्या कुटूंबात कोरोनाचा फैलाव होणार नाही.
- लॉकडाऊनचा उद्देश सफल होण्यास मदत होणार.