Video : खरच 'त्या' गाण्याने कोरोना जाणार का...?

corona virus song viral on social media
corona virus song viral on social media

कोल्हापूर - जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. हा व्हायरस आतापर्यंत तब्बल ११९  देशांत पोहोचला आहे. भारतातही आतापर्यंत ७४ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रात १२ रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग या रोगापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे नेटीझन्स कोरोनावरून वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. कोरोनावरून विनोदी किस्से आणि गाणी शेअर होत आहेत. सध्या असेच कोरोनावरील एक गाणे सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. 

"गो कोरोना गो" असे बोल असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्याला रिमिक्स केले असून त्यामधून कोरोनाला परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय त्यामध्ये सध्या फोनसाठी सुरू असलेली डायलटोनही समाविष्ट करण्यात आली आहे. कोरोनाने किमाण हे गाणे एेकूनतरी परत जावे अशा आशयाच्या मेसेजसह हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. या गाण्याचा निर्माता कोण आहे याबद्दलची माहीती मिळाली नाही. परंतु, नेटीझन्स मात्र या गाण्याचे चांगलेच फॅन झाले आहेत. काहींनी तर आपल्या मोबाईलची रिंगटोनही हेच गाणे ठेवले आहे.    

केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचा व्हिडिओही नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्येही मुंबई येथील चिनी महावाणीज्य दूत गुओकाई आणि बाैध भिक्कू यांच्या समवेत एका प्रार्थना सभेत गो कोरोना गो अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओही व्हायल झाला होता. 

दरम्यान, काल (ता. १२) सिंधुदुर्गमध्येही कोरोनावर गाणे आले आहे. "कोरोना व्हायरस देवा नको येवू दे महाराष्ट्रात... देवा
 नको येवू दे, महाराष्ट्रात...होळीच्या होमात त्याचा भस्म होवू दे जळुनी....त्याचा भस्म होवू दे, जळुनी" संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील हे तीव्र बोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होळी निमित्त काढल्या जाणाऱ्या खेळात (नाच्या) गायले जात आहेत. त्याचा व्हिडिओ बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील सोशल मिडियावर कोरोना पेक्षा वेगाने व्हायरल झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com