esakal | Video : Coronavirus : आता कोरोनावरही आले गाणे....

बोलून बातमी शोधा

holi festival coronavirus song in sindudurg kokan martahi news

"कोरोना व्हायरस देवा नको येवू दे महाराष्ट्रात... देवा नको येवू दे, महाराष्ट्रात...होळीच्या होमात त्याचा भस्म होवू दे जळुनी..

Video : Coronavirus : आता कोरोनावरही आले गाणे....
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : "कोरोना व्हायरस देवा नको येवू दे महाराष्ट्रात... देवा नको येवू दे, महाराष्ट्रात...होळीच्या होमात त्याचा भस्म होवू दे जळुनी.... त्याचा भस्म होवू दे, जळुनी" संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील हे तीव्र बोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होळी निमित्त काढल्या जाणाऱ्या खेळात (नाच्या) गायले जात आहेत. त्याचा व्हिडिओ बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील सोशल मिडियावर कोरोना पेक्षा वेगाने व्हायरल झाला आहे.

   जगात सध्या कोरोना व्हायरसने धूमकुल माजविले आहे. या रोगाच्या पाश्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहिर केलेली आहे. चीन, जपान सारख्या देशात उदय झालेल्या या कोरोनाने हाहा म्हणता भारतात शिरकाव करीत पूर्ण देशात थैमान घातले आहे. महाराष्ट्र सुद्धा यातून सुटलेला नाही.

हेही वाचा- व्हॉट्‌सॲपवरील त्या मेसेजमुळे मोडले तिचे लग्न...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भितीचे वातावरण

सिंधुदुर्गची सीमा असलेल्या गोवा राज्यात याचे रुग्ण आढळले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळला होता. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या रोगाचा सामना करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणारे शासकीय कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने रद्द केले असून असे खाजगी कार्यक्रम सुद्धा करण्यास शासन मनाई करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या.... अन् गमवावा लागला त्याला जीव...

"गोमूचा नाच" म्हणजे

  कोकण प्रांतात मोठ्या उत्साहात संपन्न होणारा 'होळी' उत्सव सुरु होवून तीन दिवस झाले आहेत. या होळी उत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात "गोमूचा नाच" हा कार्यक्रम जिल्ह्यातील वाडी-वाडीत स्वतंत्रपणे काढला जातो. यामध्ये मारुती, कृष्ण, राधा या प्रमुख वेशभूषा असतात. तबला व चकवा तसेच हार्मोनियमच्या तालावर गाणी गायली जातात. त्याच्या तालावर गोमू नाचात सहभागी झालेले युवक ठेका धरून नाचत असतात. यावेळी गायली जाणारी गाणी स्थानिक वस्तुस्थितिवर भाष्य करणारी असतात. अनेकांची फिरकी घेणारी असतात. तसेच देव व निसर्ग याची महती सांगणारी असतात.

हेही वाचा-पोलिसाला थप्पड मारने त्याला पडले महागात....

गोमू नाचात कोरोना

  होळीच्या दिवशी गावराठीची होळी घातल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गोमूचा नाच सुरु होतो. घरोघरी गेल्यावर गाणी पंचारती देवून गोमूचा सन्मान केला जातो. यात गोमूला हळदीकुंकू हा सुहासिनीचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे 'शबय' म्हणून पैसे दिले जातात. यावर्षी या गोमू नाचात कोरोना विरोधी भावना उमटत आहेत. नाच्याच्या माध्यमातून "कोरोना व्हायरस महाराष्ट्रात येवू देवू नको" अशी मागणी देवाकडे केली जात आहे. त्याचा "भस्म" होळीकडे करण्यात येणाऱ्या होमात होवू दे, असेही आवाहन करण्यात आले आहे.याचा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य ठिकाणी सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. त्यामुळे काही जणांनी व्हाट्स अपला स्टेटस ठेवला आहे. 

हेही वाचा- ‘मी आमदार बोलतोय...तोतयाने केला काॅल अन्.... ​
सुखशांती लाभु दे

या गाण्यात "कोरोना व्हायरस देवा नको येवू दे... महाराष्ट्रात देवा नको येवू दे, महाराष्ट्रात...होळीच्या होमात त्याचा भस्म होवू दे जळुनी.... त्याचा भस्म होवू दे, जळुनी. होळीच्या सणात सुख शांती लाभु दे घरात..सुखशांती लाभु दे, घरात" अशा प्रकारे आळवणी करण्यात आली आहे.