कोरोनाचा पक्षांवरही झालाय असा परिणाम 

संजय खूळ
गुरुवार, 12 मार्च 2020

विणीसाठी स्थलांतरीत होणारे पोपट यावर्षी अद्यापही सुंदर बागेतच ठाण मांडून आहेत. पक्षातील हा बदल एकूणच बदलत्या वातावरणाबाबत आत्मचिंतन करावयास लावणारा आहे.
शहरातील सुंदर बागेला संस्थान काळापासून परंपरा आहे.

इचलकरंजी : बदलत्या वातावरणाचा पक्षावरही कशा पध्दतीने परिणाम होत आहे याचे चित्र येथील सुंदर बागेतील झाडावर दिसून येत आहे. दरवर्षी मे महिन्यामध्ये येणारे नाईट हेरॉन पक्षी आतापासूनच घरटी बांधण्यासाठी बागेमध्ये येत आहेत. तर विणीसाठी स्थलांतरीत होणारे पोपट यावर्षी अद्यापही सुंदर बागेतच ठाण मांडून आहेत. पक्षातील हा बदल एकूणच बदलत्या वातावरणाबाबत आत्मचिंतन करावयास लावणारा आहे.
शहरातील सुंदर बागेला संस्थान काळापासून परंपरा आहे. त्यावेळी लावण्यात आलेले अनेक देशी झाडे आजही या उद्यानात टिकून आहेत. शहराच्या मध्यवस्तीत गर्द वनराई म्हणून सुंदर बागेला पक्षांनी महत्व दिले. त्यामुळेच या ठिकाणी हजारो पक्षांचे वास्तव्य नियमीतपणे असते. त्यात तब्बल वीसहून अधिक पक्षांचा समावेश असतो.

हे पण वाचा -  इराण मध्ये अडकलेल्यांसाठी शरद पवार आले धावून... 

या ठिकाणाहून दरवर्षी स्थलांतरीत होणारे आणि आगमन करणाऱ्या पक्षाबाबत इचलकरंजी पक्षीमित्र संघटनेने सातत्याने नोंदी ठेवल्या आहेत. पक्षी गणननेच्या पार्श्‍वभूमीवर कोणकोणते बदल पक्षामध्ये होतात याच्याही नोंदी ही संघटना सतत ठेवत असते. नाईट हेरॉन हा पक्षी दरवर्षी 15 मे नंतर घरटी बांधण्यासाठी सुंदर बागेतील झाडावर येतात. नाईट हेरॉन म्हणजे रात्रींचर बगळे, पानकावळे या पक्षांचा समावेश होतो. पावसाळापूर्वी घरटी बांधण्यास ते सुरवात करतात. पावसाळ्यामध्ये हे पक्षी याच ठिकाणी पिल्लांना जन्म देतात. पावसाळ्यानंतर पुन्हा हे पक्षी या ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन पुन्हा मे महिन्यातच या बागेतील झाडावर येतात.
यावर्षी मात्र 1 मार्च पासूनच नाईट हेरॉन पक्षी सुंदर बागेमध्ये येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे आतापासूनच त्यांची घरटी बांधण्याची तयारी सुरू झाली आहे.

हे पण वाचा - सांगलीत महिलांनी 'या' कारणासाठी पुरुषांना दिले काठीने फटके... 

सुंदर बागेत पोपट पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोज सकाळी थव्याने जाणारे पोपट अनेकांना या ठिकाणी लक्ष वेधून घेतात. हे पक्षी विणीच्या हंगामासाठी या महिन्यातच स्थलांतरीत होतात. मात्र हे स्थलांतर होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. एकूणच वातावरणातील बदलाचा पक्षांच्या जीवनमानावर होणारा परिणाम यातून स्पष्ट होतो.

वातावरणातील खूप मोठा बदल पक्षांवर होत आहे. अन्यत्र ठिकाणी कितपत सुरक्षित जागा मिळेल याबाबतही संभ्रमावस्था आहे. त्यामुळेच आगमन होणारे पक्षी दोन महिने लवकरच या ठिकाणी आले आहेत. तर स्थलांतरीत होणारे पोपट अद्यापही या ठिकाणी तळ ठोकून आहेत.
-चित्कला कुलकर्णी, पक्षी मित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus effects on birds