Coronavirus : रविवारी जनता कर्फ्यू : काय सुरू; काय बंद राहणार... वाचा

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 21 मार्च 2020

रविवारी (ता. २२) जनता कर्फ्यू असल्यामुळे शहर-जिल्ह्यात एकही व्यक्ती रस्त्यावर दिसणार नाही, याची खबरदारी सर्वच पातळीवर घेतली जात आहे.

कोल्हापूर : शहरात आज दुपारनंतर पोलिसांनीच दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यामुळे बंदसदृश स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी काही दुकाने वगळता शहरात बंद असल्याचे जाणवत होते. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल शटडाऊनच्या दिशेने सुरू आहे.
जीवनावश्‍यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याचा परिणाम आज शहरात जाणवला. शनिवार (ता. २१) पासून याची तीव्रता वाढणार आहे.

रविवारी (ता. २२) जनता कर्फ्यू असल्यामुळे शहर-जिल्ह्यात एकही व्यक्ती रस्त्यावर दिसणार नाही, याची खबरदारी सर्वच पातळीवर घेतली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच नागरिकांनी धान्यबाजारापासून इतर ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. याच दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत जीवनावश्‍यक वस्तू आणि दळणवळण वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले. दुपारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी पोलिस जीप मधूनच सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार शिवाजी रोड, लक्ष्मीरोड, महाद्वार रोडवरील दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे बंदबाबत चर्चा सुरू झाली. फोनाफोनी सुरू झाली. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूकही कमी झाली.

हेही वाचा- चीनचा कच्चा माल बंद झाल्याने `या` कंपनीचे उत्पादन घटले

जिल्ह्याची वाटचाल शटडाऊनच्या दिशेने​
दुपारनंतर दुकाने इतर व्यवसाय बंद करण्याच्या सूचना असल्या तरीही बॅंका, वृत्तपत्रे, औषध दुकाने, भाजीमार्केट, रेस्टॉरंट, हॉटेल, एस.टी., केएमटी, रेल्वे सेवा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळनंतर उमा टॉकीजजवळील पेट्रोलपंपावर दुचाकी आणि मोटारींची रांग दिसत होती.शहरातील सर्व फेरीवाले ३१ मार्चपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवतील, असा निर्णय त्यांच्या संघटनांनी घेतला आहे. प्रदेश कॉग्रेसने बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष महमंदशरीफ शेख यांनी जाहीर केले आहे. सर्व सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीनेही भाजीपाला मार्केट व्यतिरिक्त सर्व मार्केट बंद राहतील, असे जाहीर केले. आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा-परदेशावरून येणाऱ्यासाठी इथे चेक पोस्ट

पेट्रोल पंप रविवारी सुरू राहणार
जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनने रविवारी (ता.२२) सुद्धा पेट्रोल-डिझेल पंप बंद राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असेही आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र गजकुमार यांनी केले आहे.

हेही वाचा- चंदगड, आजऱ्यात बीएसएनएलचा दोन दिवसांपासून खेळखंडोबा ​
काय सुरू; काय बंद राहणार...
 महा ई सेवा केंद्र बंद राहणार  फेरीवाले ३१ पर्यत बंद पाळणार
 खाद्यपदार्थ, चहा, नाश्‍ता, हार्डवेअर, इलेिक्‍ट्रक  व इलेक्‍ट्रॉनिक विक्रेते, फटाके, गिफ्ट शॉप, कुल्पीवाले, रद्दीवाले, रस्त्यावरील विक्रेते बंदमध्ये सहभागी.हॉटेल, रेस्टॉरंट, बॅंका, अत्यावश्‍यक सुविधा, औषध दुकाने, विश्रांती गृहे सुरू राहणार  भाजी मार्केट सोडून इतर सर्व मार्केट बंद राहणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact District Close What Starts What stops kolhapur marathi news