यंदा ‘नारळ’ फुटलेच नाहीत ; कोल्हापूरातील रेकॉर्डिंग स्टुडिओतील ‘आवाज’ थांबलेलाच

coronavirus impact for ganesha festival working  in kolhapur This time  live shows are low
coronavirus impact for ganesha festival working in kolhapur This time live shows are low

कोल्हापूर : गेल्या वर्षी कधी नव्हे एवढा महापुराचा विळखा कोल्हापूरला पडला आणि यंदा तर कोरोनाने साऱ्यांनाच स्वतःचा जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. साहजिकच यंदाच्या गणेशोत्सवावरील कोरोनाचे सावट आणखी गडद होत असून, यंदाच्या उत्सवात देखावे सादर होण्याची शक्‍यता कमी आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर रेकॉर्डिंग स्टुडिओतील कामाचे ‘नारळ’ अद्यापही फुटलेले नाहीत. त्यामुळे या स्टुडिओ आणि तेथील कलाकारांना महापालिका निवडणुकीचीच प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे.  

  यंदा सजीव देखाव्यांची शक्‍यता कमी
शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा परिसर, कसबा बावड्यात सजीव देखाव्यांची, तर शिवाजी उद्यमनगर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आदी भागांना तांत्रिक देखाव्यांची परंपरा आहे. सोमवार, शुक्रवार, शनिवार, जुना बुधवार या पेठांना तर काही वर्षांत प्रबोधनाच्या पेठा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गेल्या वर्षी महापुरामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला असला तरी येथील मंडळांनी देखाव्यातून प्रबोधनाची परंपरा जपली होती.

गणेशोत्सवापूर्वी किमान पंधरा दिवस अगोदर रेकॉर्डिंग स्टुडिओत अनेक मंडळांची कामे सुरू असतात. यंदा मात्र कोरोनामुळे गर्दीच करता येणार नसल्याने देखावे सादर होण्याची शक्‍यताच नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर रेकॉर्डिंग स्टुडिओत शांतता अनुभवायला मिळत आहे. यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना मोठा फटका बसणार आहे.

स्टुडिओ बंदच आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात काही कलाकार व वादकांना विविध संस्थांनी मदतीचा हात दिला. पण, आता अनेक कलाकार व वादकांना अखेर रोजगाराचा दुसरा पर्याय शोधावा लागला आहे. 
- यशवंत वणिरे, सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ

दृष्टिक्षेपात
  शहरात रेकॉर्डिंग स्टुडिआे     १० ते १२ 
  कलाकार व वादक     ३५० ते ४००


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com