सावधान : कोल्हापुरात निर्बंध कडक ; नियम मोडणाऱ्यावर अशी होणार कारवाई

coronavirus security alert kolhapur administer pricocations covid 19 marathi news
coronavirus security alert kolhapur administer pricocations covid 19 marathi news

कोल्हापूर : राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जाहीर निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर सोमवार (ता. २२) पासून कारवाई होणार आहे. लग्न समारंभासह सार्वजनिक कार्यक्रम, सभांवर निर्बंध आहेत. ते डावलल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी, यापूर्वी दिलेल्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 


‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही’ याची अंमलबजावणी व्यापारी दुकाने, खासगी व शासकीय आस्थापना, मॉल्स, फेरीवाले, भाजी-फळे विक्रेते, कारखाने, प्रवासी वाहने, ऑटो रिक्षा आदी ठिकाणी करावी. तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थुंकण्यास परवानगी असणार नाही, असेही निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे या निर्देशांचे पालन सर्व सबंधितांकडून काटेकोरपणे होत असल्याबाबतची खात्री करावी, उल्लंघन दिसल्यास दंडात्मक कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

प्रशासनाच्या सूचना 
- सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखावे
- सॅनिटायझरचा वापर करणे व स्वच्छता राखणे 
- सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, अंत्यंविधी, अंत्ययात्रा यासाठी ५० लोकांचीच उपस्थिती अनिवार्य
- आठवडा बाजाराला परवानगी, पण खबरदारी घ्यावी लागणार  
- प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील धार्मिक स्थाने, प्रार्थनास्थळे अटी व शर्तीवर सुरू 
- राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका, संमेलने यासारख्या मोठ्या कार्यक्रमांना बंदीच 
- शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या आदी ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्स आवश्‍यक 
- हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच ग्राहकांना परवानगी 
- स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक शौचालये, बस, रेल्वे स्थानकांचे निर्जंतुकीकरण करावे 
- प्रवासा दरम्यान मास्कचा वापर बंधनकारक, अन्यथा दंड
- सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी करावी
- रुग्णाच्या संपर्कातील २० जणांची कोविड टेस्ट करावी 
- नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल सुसज्ज ठेवा
- वेगाने प्रसार करणाऱ्या व्यक्तींची वारंवार तपासणी करा

समन्वयासाठी अधिकारी नियुक्त
उपाययोजनांची अंमलबजावणी आणि कारवाईची दैनंदिन माहिती सादर करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी नियुक्त केले. महापालिका क्षेत्रातील सविस्तर माहिती देणे आणि संकेतस्थळावर सकाळी साडेदहापर्यंत अपलोड करण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, तर जिल्ह्याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महसूल तहसीलदार डॉ. मनीषा माने, राजाराम आरगे, महादेव मुत्नाळे, स्नेहल जाधव, नवनाथ डवरी यांच्याकडे आहे. 

तालुकास्तरावरील माहिती गटविकास अधिकारी, जिल्हास्तर अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर, पालिका, नगर परिषद, नगरपंचायतीसाठी मुख्याधिकारी, तर जिल्हास्तरासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी (पालिका) यांची नियुक्ती केली आहे. तालुकास्तरासाठी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, तर जिल्हास्तरीय माहितीसाठी पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. दैनंदिन अहवाल या सर्वांमार्फत सरकारपर्यंत पोचविला जाईल.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com