हिटणी पूरग्रस्त यादीत घोळ 

corruption in Hitani flood list Kolhapur Marathi News
corruption in Hitani flood list Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील पूरग्रस्तांच्या यादीत घोळ करण्यात आला असून कोतवालाने परस्पर यादीत पूरग्रस्त नसलेल्यांची नावे घुसडली आहेत. या कोतवालांच्या कारभाराची चौकशी करण्यासह नावे घालण्यासाठी मदत केलेल्या दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिटणीचे गुरगोंडा पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापूर आणि अतिवृष्टीमुळे हिटणी येथील काही घरे पूर्णत: तर काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. परंतु पूर्णत: पडलेल्या घरांच्या यादीत परस्पर कारभार करून पूरग्रस्त नसलेले व पूर्णत: घरे न पडलेल्यांची नावे घुसडण्यात आली आहेत. यामुळे काही लाभार्थी वंचित झाले आहेत.

कोतवालाकडे यादीची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आली. टोकाची भूमिका घेतल्यानंतर 25 जानेवारी रोजी यादी दिली आहे. यादीची पाहणी करता बरेच खरोखरचे लाभार्थी या यादीतून गायब झाले आहेत. महापूर आणि अतिवृष्टीशी दुरान्वयेही संबंध नसलेल्यांची नावे त्यात आहेत. याबाबत तक्रार झाल्यानंतर कोतवालाला कारणे दाखवा नोटीस बजावली. पण आजअखेर त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोतवालाविरूद्ध ग्रामस्थांच्या अनेक तक्रार आहेत.

सामान्य लोकांना त्रास देत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तलाठ्यांना अंधारात ठेवून हा कारभार केल्याचे आढळून आले आहे. यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. 

तक्रारीची माहिती घेणार 
यासंदर्भात संबंधित गावचे तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता माझ्यापर्यंत याबाबतची तक्रार आली नसून नेमक्‍या तक्रारीची माहिती घ्यावी, लागेल असे त्यांनी उत्तर दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com