कोल्हापुरात अनेक हात आले मदतीला : पंचगंगा स्मशानभूमीस 20 दिवसात साडेसहा लाखांवर शेणीदान

डॅनियल काळे
Thursday, 24 September 2020

पंचगंगा स्मशानभूमीस गेल्या 20 दिवसात साडेसहा लाखांवर शेणीदान
 

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशान भूमीस अंत्यसंस्कारासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ति आणि संस्थांकडून गेल्या पंधरा वीस दिवसात 20 दिवसात साडेसहा  अधिक शेणी दान स्वरुपाने मिळाल्या आहेत. यापुढील काळातही शहर आणि जिल्हयातील दानशूर व्यक्ति आणि संस्थांनी पंचगंगा स्मशानभूमीस मोठया प्रमाणात शेणीदान करुन सामाजिक कार्यास सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

सध्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील लोकावरही पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मयत व्यक्तिंची वाढलेली संख्या विचारात घेता नियोजनापेक्षा जास्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ पंचगंगा स्मशानभूमीवर आलेले आहे. मृत व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारासाठी मोठया प्रमाणावर शेणींची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे महापौर व आयुक्तांनी पंचगंगा स्मशानभूमीसाठी समाजातील दानशूरांनी शेणीदान कराव्यायत असे आवाहन केले होते. महापालिकेच्या या आवहानास जिल्हयातील दानशूर व्यक्ति आणि संस्थांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिल्याने केवळ 18 दिवसात 5 लाख 55 हजार 400 शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान स्वरुपात मिळाल्या आहेत. 

हेही वाचा‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षण :  कोल्हापुरात दिवसभरात २६ जणांना कोरोना, ५ रुग्ण सारीचे -

 पंचगंगा स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी या पुढील काळातही अधिकाअधिक शेणींची आवश्यकता असून दानशुरांनी शेणी दान करण्यात सक्रिय व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दि. 28 ऑगस्ट 2020 पासून आत्तापर्यंत शेणीदान केलेल्यामध्ये समाजातील दानशूर व्यक्तिं आणि संस्थांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध सेवाभावी संस्था, संघटना, तरुण मंडळे, तालीम मंडळे, गणेश मंडळे, क्रिडा व सांस्कृतिक मंडळे, ग्रामपंचायती, दुध संस्था, हायस्कूल, माहिला बचतगट, रोटरी क्लब, पत संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, विविध फौंडेशन आणि प्रतिष्ठान तसेच व्यापारी, उद्योजक, राजकीय पक्ष आणि संघटनांनी मोठया प्रमाणात शेणीदान करुन लोकसहभागाचा वाटा उचलला आहे.

हेही वाचा- कांदा उत्पादक संतप्त : कोल्हापुरात शेतकरी करणार शुक्रवारी आंदोलन -

शेणीदान बरोबरच पंचगंगा स्मशानभूमीस समाजातील दानशूरांकडून स्प्रे पंप, रक्षा भरण्यासाठी सुंपल्या, टप तसेच मास्क, सॅनिटाईजर, हॅण्डग्लोज अधिक वस्तूही दान स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. यापुढील काळातही कोरोनाची पाʉर्ाभूमी विचारात घेऊन पंचगंगा स्मशानभूमीस मोठया प्रमाणात शेणीदान कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 positve impact Six lakh donation to Panchganga cemetery in last 18 days