esakal | "आयटीआय'मध्ये पुन्हा कोविड सेंटर

बोलून बातमी शोधा

 Covid Center again in "ITI"

कोल्हापूर ः कोरोना संकटाचा धोका विचारात घेऊन पूर्वीप्रमाणे आयटीआय वसतिगृहात पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. दरम्यान, बंदीजनांच्या मुलाखती बंद करण्यात आल्याचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

"आयटीआय'मध्ये पुन्हा कोविड सेंटर
sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर ः कोरोना संकटाचा धोका विचारात घेऊन पूर्वीप्रमाणे आयटीआय वसतिगृहात पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. दरम्यान, बंदीजनांच्या मुलाखती बंद करण्यात आल्याचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
गेल्या लॉकडाउनमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या बंदींना आयटीआय वसतिगृहातील तात्पुरत्या कोविड सेंटर येथे किमान चौदा दिवस ठेवण्यात येत होते. त्यानंतर त्यांची चाचणी करून त्यांना कारागृहात हलविण्यात येत होते; मात्र ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. पण नुकतेच बिंदू चौक सबजेलमधील 31 बंदींना कोरोनाची बाधा झाली, तसे कळंबा कारागृह प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कारागृहातील बंद्यांची क्षमता 1800 असून येथे सध्या 2200 हून अधिक बंदी आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नव्याने दाखल होणाऱ्या बंदींसाठी पूर्वीप्रमाणे आयटीआय येथील कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्‍यक पोलिस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर हे सेंटर सुरू होणार आहे. तसेच ज्या बंदींना पॅरोल मंजूर होऊ शकतो, अशांचे प्रस्तावही मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, कळंबा कारागृहात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

मुलाखतींना ब्रेक 
कोरोना संसर्गाचा धोका विचारात घेऊन बंदीजन व त्यांच्या नातेवाईकांच्या भेटींना ब्रेक लावण्यात आला आहे. प्रत्यक्ष भेटी बंद करून नातेवाईकांना आता केवळ फोनवरून संपर्क साधता येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेसाठी बंदींना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली असल्याचे इंदुलकर यांनी सांगितले.