इसलिये हम फिर लौट आये ! झारखंडचे तरुण विमानाने कोल्हापुरात

संदीप खांडेकर
Monday, 5 October 2020

, हॉकी स्टेडियम चौकात कामाचा श्रीगणेशा 

कोल्हापूर: ""काम करेंगे तो खाना मिलता है!, लॉकडाउन की वजह से गाव गये! लेकीन वहॉं कोई काम नही था ! घर मे बैठकर क्‍या कर सकते थे? इसलिये हम फिर लौट आये !,'' झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मधुपूरमधून आलेला सलमान अन्सारी बोलत होता, तो व त्याचे अन्य पाच साथीदार थेट विमानाने कोल्हापुरात नुकतेच परतले. प्रति तिकिटाचा दर सुमारे सात हजार रुपये असा, खिशाला न पेलवणारा हा खर्च. पोटासाठी मात्र त्यांना अखेर कोल्हापूर गाठावे लागले आहे. 

मेजर ध्यानचंद स्टेडियमच्या चौकातील गाडीवर गरमागरम तव्याभोवती त्यांच्या व्यवसायाचा पुन्हा श्रीगणेशा सुरू झाला आहे. सलमान, शाहबाज, हातिम, नसीम, शरीफ, आझाद, रहमत, फारूख, राजू, मनुफर, अहंमद अन्सारी हे मधूपूरचे. सर्वांचे शिक्षण किमान पाचवीपर्यंतचे. गावची लोकसंख्या एक हजाराहून अधिक, गावी शेती नसल्याने साऱ्यांचीच परवड, चमचमीत पदार्थ तयार करण्याची कला मात्र त्यांच्याकडे होती. कामासाठी त्यांनी थेट पुण्यातील कोथरूड गाठले. तिथल्या हॉटेलमध्ये ते स्वयंपाकी म्हणून रुजू झाले. मिळणाऱ्या वेतनात खर्च भागणे कठीण असल्याने ते कोल्हापुरात आले. चार वर्षांपासून ते अकरा जण कोल्हापुरात स्थायिक आहेत. 
व्हेज मंच्युरियन, रोल नूडल्स, पनीर टिक्का चीज पदार्थ तयार करण्यात त्यांची खासीयत आहे. 

हेही वाचा- दिलासादायक : रत्नागिरीत दोन महिन्यात आढळले सर्वात कमी कोरोना बाधित -

संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व जण 17 मेस चारचाकी वाहनातून मधूपूरला परतले होते. तेवीसशे किलोमीटरचे अंतर दोन दिवसांत पूर्ण केले. गावी परतल्यावर केवळ बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. खिशातले पैसे कमी होत असल्याने कोल्हापुरातील संचारबंदी कधी शिथिल होणार, याची त्यांना प्रतीक्षा होती. मालक उमेश पाडळकर यांच्याशी मोबाईलद्वारे त्यांचा सातत्याने संपर्क होता. अकरापैकी सहा जण विमानाने कोल्हापुरात आले आहेत. 

 
आई, पत्नी, मुले गावी आहेत. घरखर्चासाठी त्यांना पैसे पाठविणे आवश्‍यक आहे. कोल्हापुरात चमचमीत खाणाऱ्यांची कमी नाही. मिळणाऱ्या पैशातून जेवण, घरभाड्याचा खर्च निघतो. शिवाय गावी पाठवायला पैसे शिल्लक राहतात. 
- सलमान अन्सारी,  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid lockdown Young people of Jharkhand impact story by sandeep khandeka