कोल्हापुरात एका क्लिकवर मिळणार केअर सेंटरचे अपडेट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

लवकरच‘कोल्हापूर कोरोना डॅशबोर्ड’

कोल्हापूर : जिल्ह्यात कोविड बेडची सोय असलेले कोरोना केअर सेंटर व खासगी दवाखाने यांच्यासह इतर माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी केडीएमजीतर्फे लवकरच ‘कोल्हापूर कोरोना डॅशबोर्ड’ कार्यािन्वत होत आहे. याचा फायदा कोविड सेंटर, सरकारी-खासगी रुग्णालय आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची गरज भासत आहे. जे उत्सुक आहेत त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप (केडीएमजी) तर्फे केले आहे.

कोरोना केअर सेंटर-खासगी दवाखाने यांची विस्तृत माहिती, नाव, पत्ता, संपर्क व्यक्तीचे नाव व फोन इत्यादी माहिती डॅशबोर्डवरून मिळणार आहे. सेंटर-खासगी दवाखाने यांचे ठिकाण व आपण असलेल्या ठिकाणापासूनचा मार्ग दर्शविणारी लिंक (location) सुद्धा उपलब्ध होणार आहे. डॉक्‍टरांशी बोलणे व मार्गदर्शन (टेलिमेडिसीन) मिळणेची निःशुल्क सुविधा असणार आहे. केडीएमजी पुरस्कृत डॉक्‍टरांना प्रश्न व त्यांची उत्तरे त्वरित पाहता येण्याची सोय व उपचार घेण्यासाठी योग्य अशा बेडच्या प्रकारांबाबत मार्गदर्शन देण्याची सुविधा असेल.

हेही वाचा- ‘चेतना अपंगमती’मधील ‘सीआयडी’ची चटका लावणारी एक्‍झिट..! -

स्वयंसेवकांना आवाहन
डॅशबोर्डसाठी स्वयंसेवकांमार्फत रोज सकाळी नऊपूर्वी प्रत्येक केअर सेंटर, खासगी दवाखान्यातील उपलब्ध बेडबाबतची माहिती भरणे आवश्‍यक आहे. प्रत्येक स्वयंसेवकांनी दोन कोरोना केअर सेंटर, खासगी दवाखाने याबाबत माहिती भरावयाची आहे. त्याकरिता एकूण ३४ स्वयंसेवकांची गरज आहे, अधिक माहिती शांताराम सुर्वे यांचेशी संपर्क किंवा https://coronabeds.mahaayush.com/ या लिंकवर क्‍लिक करावे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid Update of Care Center in Kolhapur available with one click