- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

सोशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या वापराविना बाळूमामांची पालखी मिरवणूक

कसबा तारळे (कोल्हापूर) : येथे बाळूमामांच्या पालखी दरम्यान विनापरवाना डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधासाठीच्या सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांना फाटा दिल्याने नऊ जणांसह अज्ञात ५० ते ६० जणांवर राधानगरी पोलिसांत आज गुन्हा दाखल झाला.
याबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी:
गेले महिनाभर राधानगरी तालुक्यातील गावागावांमधून बकऱ्यांसह फिरत असलेली बाळूमामांची पालखी कसबा तारळे येथे आली होती. पालखीच्या स्वागतासाठी डॉल्बी लावून मिरवणूक निघाली. यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाही सोशल डिस्टंसिंग कोणीही पाळले नाही आणि मास्कचा वापरही केला नाही.या कारणांमुळे राधानगरी पोलिसांनी स्थानिक नऊ जणांसह अज्ञात ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला. या नऊ जणांपैकी बहुतांशी हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत.
हेही वाचा- संभाजी भिडे गुरुजींनी आमदाराला काढायला लावला मास्क पाहा व्हिडीओ
पोलिस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ए.के.कांबळे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, कसबा तारळेहून ही पालखी जवळच्याच कुकूडवाडी गावांमध्ये दाखल झाली असून तारळे खुर्द ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत ग्रामस्थांना कोरोना कालावधीत नियमांचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास कळविले आहे.
संपादन- अर्चना बनगे
