अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन आत्याचार

crime against two boys in kolhapur kodoli police station
crime against two boys in kolhapur kodoli police station

कोडोली (कोल्हापूर)- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अक्षय चंद्रकांत नांगरे (रा. आनंदनगर, कोडोली) यास पोलिसांनी अटक केली. तसेच मुलीला पळवून नेण्यास अक्षयला मदत केल्याप्रकरणी साहिल नांगरे व अमर साळवी (रा. कोडोली) यांच्यावर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आरळे (ता. पन्हाळा) येथे मामाच्या घरी अल्पवयीन मुलगी राहण्यास आली होती. अक्षय नांगरे याने 20 सप्टेंबरला अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले. तसेच इस्लामपूर येथील लॉजवर, कोडोली येथील घरी अक्षय नांगरे याने तिच्यावर बलात्कार केला.

 याप्रकरणी अक्षय नांगरे यास अटक केली आहे. भाचीस पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी मामा सागर बुधाजी महापूरे (आरळे, ता. पन्हाळा) यांच्या फिर्यादीवरून साहिल नांगरे व अमर साळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय नांगरे यास पन्हाळा न्यायालयाने 8 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निरीक्षक सुरज बनसोडे, हावलदार चिले, नाईक सुतार तपास करीत आहेत. 

  
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com