esakal | धक्कादायक ; प्रियकराच्या साथीने पत्नीनेच काढला पतीचा काटा
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in belgaum wife and husband arrested police

11 फेब्रुवारीला सागर हा नेहमीप्रमाणे शहरातील एका नामांकित स्टील दुकानात कामावर आला होता.

धक्कादायक ; प्रियकराच्या साथीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : परपुरुषाशी निर्माण झालेल्या सलगीतून पत्नीने त्याच्या मदतीने आपल्या पतीचे अपहरण करुन खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सागर गंगाप्पा पुजेरी (वय 23, रा. सोमनट्टी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. 22) मार्केट पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

बाळप्पा भगवंतप्पा द्दिन्नी (रा. कोळ्यानट्टी), बसवराज यल्लाप्पा उप्पार (रा. कोळ्यानट्टी), मंजुनाथ पिरप्पा बिडी (रा. संपगाव) आणि नीलम्मा सागर पुजेरी (रा. सोमनट्टी) अशी संशयितांची नावे असून यांच्याविरोधात पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सागरची पत्नी नीलम्माची पहिला संशयित बाळाप्पा याच्याशी सलगी निर्माण झाली होती. त्यातूनच दोघांनी सागरचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार संशयित बाळप्पाने बसवराज आणि मंजुनाथ या दोघांना आपल्यासोबत घेतले. 11 फेब्रुवारीला सागर हा नेहमीप्रमाणे शहरातील एका नामांकित स्टील दुकानात कामावर आला होता.

हेही वाचा - हृदयद्रावक! एक वर्षाचं बाळ बिबट्याने तोंडात धरून नेलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं -

वरील तिघा संशयितांनी सागरशी संपर्क साधून त्याला किल्ला तलावाजवळ येण्यास सांगितले. तो दुपारच्या दरम्यान त्याठिकाणी आल्यानंतर तिघा संशयितांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर जोयडा येथील सुपा डॅमजवळील गणेश मंदिर येथे नेऊन त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. याबाबत सागरचे वडील गंगाप्पा मार्केट पोलिसात सागर बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी फिर्याद नोंदवून वरील तपास चालविला होता. मात्र, सागरचा खून झाल्याचे सोमवारी उघडकीस येताच वरील संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला. मृतदेहावर जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम