esakal | भरवस्तीत चोरीचा प्रकार ; दरवाजा तोडून भामट्याने ४ लाखांचा ऐवज केला लंपास

बोलून बातमी शोधा

crime case in kolhapur theft in rukadi rupees 4 lakh}

घरातील तिजोरी फोडली व त्यातील सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

kolhapur
भरवस्तीत चोरीचा प्रकार ; दरवाजा तोडून भामट्याने ४ लाखांचा ऐवज केला लंपास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हातकणंगले (कोल्हापूर) : रुकडी (ता. हातकणंगले) येथे बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चोरट्यांनी तेथील एकनाथ दत्तात्रय कुलकर्णी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील तिजोरी फोडली व त्यातील सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

हेही वाचा - कोल्हापूर : मतदार यादी बिनचूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न -

याबाबत हातकणंगले पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आज सकाळी शेजाऱ्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती माजी उपसरपंच शीतल खोत यांना दिली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. गावातील महादेव मंदिराशेजारी भरवस्तीत एकनाथ कुलकर्णी यांचे घर आहे. ते पत्नी समवेत राहतात. ते निवृत्त बॅंक कर्मचारी, तर पत्नी निवृत्त पोस्ट कर्मचारी आहे. हे दाम्पत्य घरगुती कार्यक्रम असल्याने बाहेर गावी गेले होते. बुधवारी रात्री चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तिजोरी फोडून त्यातील पाच तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. या प्रकाराने नागरिकांमध्ये घबराहट आहे. पथकातील श्‍वानाने घटनास्थळापासून शेतापर्यंतचा माग दाखविला. तेथे श्‍वान घुटमळले. ठसेतज्ज्ञांना काही ठसे मिळाले आहेत. ते पुरुषाचे असल्याचे निदर्शनास आले आहे.

संपादन - स्नेहल कदम