esakal | कोल्हापूर : 'मतदार यादी बिनचूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न'

बोलून बातमी शोधा

problem of voters list not solve in kolhapur municipal corporation}

प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवार तसेच नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात  हरकती घेतल्या.

कोल्हापूर : 'मतदार यादी बिनचूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीतील घोळ निस्तरण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक हरकतीची दखल घेऊन मतदार यादी बिनचूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे उपायुक्त रविकांत आडसूळ 
यांनी सांगितले.

हेही वाचा - कोल्हापूर - पन्हाळा रोडवर झालेल्या अपघातात पाटबंधारे विभागातील अधिकारी जागीच ठार -

महापालिका निवडणूकपुर्व प्रक्रियेंतर्गत प्रारुप मतदार याद्या १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाल्या; पण त्यात प्रचंड गोंधळ असल्याचे समोर येवू लागले. प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवार तसेच नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात  हरकती घेतल्या. नावे या प्रभागातून त्या प्रभागात मतदार गेल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या गंभीर स्वरुपाच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाला आता वेळ मिळाला आहे. या मिळालेल्या वेळेच फायदा घेत प्रत्येक हरकतीची पडताळणी सुरू आहे. याद्या दुरुस्तीचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे.

संपादन - स्नेहल कदम