esakal | मुलानं प्रेमविवाह केला; वडिलांवर घरात घुसून जीवघेणा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

crime cases in ichalkaranji attack on one person injured

गेल्या चार दिवसांपासून दोन खून व प्राणघातक हल्ला या परिसरात झाला आहे.

मुलानं प्रेमविवाह केला; वडिलांवर घरात घुसून जीवघेणा हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात डॉक्‍टरवरील प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाच प्रेमविवाह करण्यास मुलग्यास फूस लावल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पुन्हा एकावर खुनी हल्ला झाला. आसरानगर (साईट नंबर १०२) मध्ये घरात घुसून चार हल्लेखोरांनी लाकडी ओंडक्‍याने रमजान सय्यद  शेख (वय ४१) यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना आयजीएममध्ये दाखल केले आहे. मध्यरात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना संशयावरून ताब्यात घेतले.

गेल्या चार दिवसांपासून दोन खून व प्राणघातक हल्ला या परिसरात झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या खुनी हल्ल्याने या भागात खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आसरानगरमध्ये शेख राहतात. ते यंत्रमाग कामगार आहेत. त्यांच्या मुलग्याने गेल्या काही दिवसांपूर्वी एका युवतीशी प्रेमविवाह केला. त्यादिवसापासून शेख कुटुंबीयावर काही जण चिडून होते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शेख यांच्याकडे अनोळखी चार व्यक्ती आल्या. त्यांनी अचानकपणे शेख यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी ओंडक्‍याने डोक्‍यात व पाठीवर गंभीर मारा केले. त्यात शेख रक्तबंबाळ झाले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यांच्या ओरडण्यामुळे जमलेल्या नातेवाईकांनी त्यांना त्वरित आयजीएममध्ये हलविले.

हेही वाचा - देवगड, रत्नागिरी हापूस आंबा सांगलीत दाखल
 

याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, गावभाग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन संशयित मारेकऱ्याच्या शोध सुरू केला. मध्यरात्री चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम पहाटेपर्यंत गावभाग पोलिस ठाण्यात सुरू होते.

संपादन - स्नेहल कदम