ब्रेकिंग - कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

crime file because a rumor spread about Corona
crime file because a rumor spread about Corona

इचलकरंजी (कोल्हापूर) - इचलकरंजीतील कलागनर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तलाठी स्वप्नील संपतराव घाटगे (वय 36, रा. रुकडी) यांनी तक्रार दिली आहे. 

एका व्हॉट्‌स अप ग्रुपवर कलानगर परिसरात दोन जोडपी कोरोनाग्रस्त असल्याच्या खोटा मजकूर प्रसारित करण्यात आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. प्रशासनही हबकून गेले, मात्र याबाबत खात्री करण्यात आल्यानंतर ही अफवा निघाली. याबाबत प्रशासनाकडून तलाठी घाटगे यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. 

या तक्रारीनुसार संबंधित व्हॉट्‌सअप ग्रुपवरील मोबाईल क्रमांकधारकाला ताब्यात घेतले. त्यानंतर व्हायरल करणाऱ्या आणखी तिघांकडे पोलिस चौकशी करीत होते, तर खोटा मजकूर तयार करणाऱ्या मूळ संशयितांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस करीत होते. 

दरम्यान, एका पत्रकाराच्या नावाने हा खोटा मजकूर प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील पत्रकारांनी याबाबत संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. प्रांताधिकारी विकास खरात यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com