esakal | वस्त्रनगरी धास्तावली ; गंभीर गुन्ह्यांत वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

crime rate increase in ichalkaranji

वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसविण्यासाठी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी "मोका" सारखे शस्त्र बाहेर काढले.

वस्त्रनगरी धास्तावली ; गंभीर गुन्ह्यांत वाढ 

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी - वस्त्रनगरीत पून्हा एकदा गुन्हेगारीने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्याभरात अनेक गंभीर गुन्हेच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीने शहर पून्हा हादरले आहे. पोलिसांनी केलेल्या "मोका" सारख्या टोकाच्या कारवाईनंतर शहरातील गुन्हेगारी शांत झाली होती. पण गेल्या कांही दिवसांतील गंभीर घटनांमुळे वस्त्रनगरीतील गुन्हेगारी पून्हा एकदा चर्चेत आली आहे. 

शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत होत्या. त्यांच्या भितीने वस्त्रोद्योग धास्तावला होता. वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसविण्यासाठी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी "मोका" सारखे शस्त्र बाहेर काढले. पाहता पाहता एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 16 गॅंगवर "मोका" अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे गेल्या एक - दोन वर्षात शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीने "मोका" कारवाईची मोठी धास्ती घेतली होती. त्याचा परिणाम शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले होते.
तथापी, गेल्या कांही दिवसांपासून पून्हा एकदा गुन्हेगारी प्रवृतीने डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध धंद्याचा पून्हा विळखा वस्त्रनगरीला पडत असल्याचे गेल्या कांही दिवसांपासून करण्यात येत असल्याचे कारवाईनंतर स्पष्ट होत आहे. बंद असलेला मटका आता शहरात सर्रास सुरु आहे. पोलिसांची कारवाई सुरु आहे. पण मटका बंद झालेला नाही. कर्नाटकातून गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लॉक डाऊनच्या काळात याबाबत धडक कारवाई झाली होती. त्यानंतर मात्र याबाबतची कारवाई थंडावली आहे. जुगार अड्ड्यांना तर पेव आले आहे. पोलिसांच्या कारवाईचा कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. 

गेल्या कांही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यांत घट झाली होती. पण आता पुन्हा अशा गुन्ह्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. खून, खूनी हल्ला, खंडणी, सावकारी, फसवणूक, चोरी या सारख्या घटनांची मालिकाच गेल्या कांही दिवसांत शहरात सुरु आहे. शहरात कारवाईसाठी सक्षम पोलीस यंत्रणा आहे. त्यानंतरही वस्त्रनगरीतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणून पून्हा एकदा कारवाईचा धाक निर्माण करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. 

हे पण वाचालष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत तब्बल पाच जणींशी केले लग्न; वीरपत्नींना हेरुन पेन्शन मंजूर करतो म्हणत केली फसवणूक  

पोलिस अधिकारी बदलले अन्‌...
शहरात वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रण आणण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी दबदबा निर्माण केला होता. कारवाईच्या भितीने अनेक गुन्हेगारांनी शहर सोडले. पण आता पोलीस अधिकारी बदलल्यानंतर पून्हा एकदा गुन्हेगारी कारवाया सुरु झाल्या आहेत. 


संपादन- धनाजी सुर्वे