....त्यामुळे आहे मगरींचा वावर ; कुठे ते वाचा

crocodile get along area of panchaganga river and the forest officers appeal to farmers in kolhapur
crocodile get along area of panchaganga river and the forest officers appeal to farmers in kolhapur
Updated on

कोल्हापूर : पुराच्या पाण्याच्या फुगवट्यातून वारणा व कृष्णानदीतील मगर पंचगंगेच्या प्रवाहात आल्या असाव्यात. वाहत्या पाण्याबरोबर त्या पुढे निघून जातील, असा अंदाज आहे. मात्र मगरींचा नदीतील वावर धोकादायक असल्याने लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती वनविभागाचे करवीरचे वनपाल विजय पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पंचगंगा नदीत मगरींचा वावर फारसा नव्हता; मात्र तीन महिन्यांपूर्वी चिखली ते शिवाजी पूल परिसरात मगर आढळली. काल कसबा बावडा येथेही पूर्ण वाढ झालेली मगर बंधाऱ्यावर पहुडली होती. यापूर्वीच्या नोंदीनुसार नृसिंहवाडी ते हेरवाडपर्यंत मगरी आढळत. अलीकडे कसबा बावडा, चिखलीपर्यंत नदीत मगर दिसते. यातून पंचगंगा त्यांचे तात्पुरते वसतिस्थान झाल्याचे दिसते. वनविभागाच्या निरीक्षणानुसार, वारणा, कृष्णा नदीत सांगली जिल्ह्यातील औदुंबर परिसरात मगरींचा वावर आढळला आहे. या दोन्ही नद्यांच्या उगमस्थानाजवळ असलेल्या धरणे व तलाव पाणलोटातून मगरी पुरामुळे नदीत येतात.

वाहत्या पाण्यासोबत पुढे कर्नाटक सीमेपर्यंतही जातात. पूर कालावधीत पाण्याचा फुगवटा जास्त काळ राहिला, तर त्या उलट दिशेने पोहत काठ गाठण्याचा प्रयत्न करते. चिखल, खाद्य असलेल्या भागात वास्तव्य राहते. नृसिंहवाडीतील कृष्णेतून हेरवाड येथील पंचगंगेत मगर उलट दिशेने येऊ शकते. एखादेवेळी नर-मादी दीर्घकाळ पात्रात वास्तव्यास राहते. बावडा किंवा चिखली येथे दिसलेल्या मगरी पूर्ण वाढ झालेल्या आहेत. यावरून वरील बाब 
स्पष्ट होते.

शेतकऱ्यांना आवाहन

नदीकाठच्या अवतीभवतीच्या दहा ते वीस फूट अंतरात वावर आढळतो. निरव शांततेत ती हमखास बाहेर येते. त्यामुळे नदीकाठच्या शेतीत जाणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. मगर दिसताच वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.

विभागात खास प्रशिक्षण

मगर पकडण्यासाठी वन विभागात खास प्रशिक्षण घेतलेले वनपाल, वनरक्षकांचे १२ जणांचे पथक आहे. दोरखंड किंवा जाळी टाकून मगर पकडली जाते, त्यानंतर त्यांच्या अधिवासात सोडली जाते.

ती मगर ही नव्हे

वारणा नदीत वर्षभरात १२ मगरी वनविभागाने पकडल्या. कोल्हापुरात शिवाजी पुलाजवळील मगर अपोआप निघून गेली. कसबा बावड्यात आढळलेली मगर वेगळी आहे. चिखली येथे दिसलेली ही मगर नव्हे, असे निरीक्षण करवीर वन क्षेत्रपाल सुधीर सोनवणे व विजय पाटील यांनी नोंदवले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com