दारूसाठी काय पण ; तळीराम पोहोचले चक्क दुसऱ्या राज्याच्या सीमेवर 

संजय खूळ
Monday, 4 May 2020

शहरात दरमहा तब्बल दहा ते बारा हजार लिटर दारू रिचवली जाते. गेली दीड महिने दारू दुकाने पूर्णपणे बंद आहेत. तरीही यातून मार्ग काढण्यासाठी शहरात चोरट्या मार्गाने दारू आणण्यासाठी अनेकांचे प्रयत्न झाले. मात्र चार वेळा पोलिसांनी धाडी टाकून हा डाव उधळून लावला

 

इचलकरंजी  - आजपासून वाईन शॉप सुरु होणार या आनंदात असलेल्या शहरातील तळीरामांची पुरती निराशा झाली. याला उपाय म्हणून शहराच्या सीमेवरच कर्नाटक भागात असलेल्या एका वाईन शॉपवर  शहर वासियांनी तोबा गर्दी केली.  लांबलचक  रांगा या वाईन शॉप समोर लागल्या होत्या.
  

शहरात तब्बल 100 हून अधिक वाईन शॉप, बिअर बार आहेत. उत्पादन शुल्क खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात दरमहा तब्बल दहा ते बारा हजार लिटर दारू रिचवली जाते. गेली दीड महिने दारू दुकाने पूर्णपणे बंद आहेत. तरीही यातून मार्ग काढण्यासाठी शहरात चोरट्या मार्गाने दारू आणण्यासाठी अनेकांचे प्रयत्न झाले. मात्र चार वेळा पोलिसांनी धाडी टाकून हा डाव उधळून लावला. नजीकच्या तालुक्यातून चोरट्या मार्गाने टेम्पोतून दारूची वाहतूक होत होती. मात्र पोलिसांचे लक्ष अधिकच लागल्याने हा प्रयत्न बंद झाला.

हे पण वाचा - मद्यपींसाठी महत्वाची बातमी ; याच नियमांनी आणि याच वेळेत मिळणार दारू

आजपासून वाईन शॉप सुरू होणार म्हणून सकाळपासूनच अनेकांनी दुकानासमोर गर्दी केली होती. मात्र काही वेळाने शहरातील दुकाने आज सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झाले आणि अनेकांची निराशा झाली. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी नामी शक्कल शोधली. इचलकरंजी शहराला लागूनच कर्नाटकाची हद्द आहे. इचलकरंजी हुपरी हा मार्ग प्रशासनाने सील केला नाही कारण हा रस्ता महाराष्ट्राच्या हद्दीतून जातो. मात्र या हद्दीच्या सीमेवरच रस्त्याकडेला माणकापूर या गावी वाईन शॉप आहे. याठिकाणी दारू मिळत असल्याचे समजताच शहरातील अनेक जण आपला मोर्चा तिकडे वळवला. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली रस्त्याकडेला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर कर्नाटक पोलिसांनी एकूणच गर्दी पाहून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला.

हे पण वाचा -  बापरे ; दारू खरेदीसाठी आमच्या परिसरात का आला म्हणत तरूणाला बेदम मारहाण

कोल्हापुरातील प्रेत्येक घटना घडामोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd on maharashtra karnataka boundary who alcohol purchasing