esakal | मद्यपींसाठी महत्वाची बातमी ; 'याच' नियमांनी आणि 'याच' वेळेत मिळणार दारू 
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohol shop start only 10 am to 6 pm in kolhapur

मद्य विक्री दुकानामध्येच मद्य पिणाऱ्यांवर आणि दुकानावर कारवाई होणार आहे. तसेच, दुकानांचा परवाना रद्द केला जाणार असल्याच्या सूचनाही श्री पाटील यांनी दिल्या आहेत. 

मद्यपींसाठी महत्वाची बातमी ; 'याच' नियमांनी आणि 'याच' वेळेत मिळणार दारू 

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेतच मद्य विक्री सुरू करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिले आहेत. यामध्ये, सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील. शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालु करता येणार नाहीत. तसेच कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील सुरु करता येतील.

 दरम्यान, मद्य विक्री दुकानामध्येच मद्य पिणाऱ्यांवर आणि दुकानावर कारवाई होणार आहे. तसेच, दुकानांचा परवाना रद्द केला जाणार असल्याच्या सूचनाही श्री पाटील यांनी दिल्या आहेत. 

हे पण वाचा - कोल्हापूरमध्ये उद्यापासून हे सुरू राहणार, हे  बंद राहणार

अशी होईल मद्य विक्री 

सीलबंद, दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक असू नये, दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर बंधनकारक , सहा फूटांवर वर्तुळ आखणे बंधनकारक, संबंधित परवानाधारकाने कामगार, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे, सर्दी, खोकला व ताप असणाऱ्यांना दुकानात प्रवेश देवू नये, दोन तासांनी दुकान परिसर निर्जंतूकीकरण करणे,  ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात द्यावा, किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये नियम पाळणे बंधनकारक,
 सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत राहतील.
 मद्य बाळगणे, खरेदी करण्याच्या क्षमतेचा भंग होवू नये, 
दुकानामध्ये दारू पिल्यास परवाना निलंबित, नियमांचा भंग दुकान बंद करून त्यांच्याविरूध्द कारवाई होणार.

हे पण वाचा -   Video :...तर कोल्हापुरात लॉकडाऊन वाढेल  ना.मुश्रीफ मुश्रीफ यांचा इशारा..

कोल्हापुरातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 

go to top