esakal | सकाळ इम्पॅक्ट : विद्यापीठाच्या परीसरात चहागाडी चालविणाऱ्या सासू- सुनेला मिळाली आपुलकीची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

daily sakal Impact A check for Rs. 15,000 was given by a former student of the 2002 batch of the Physics Department of the University

 शिवाजी विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी फक्कड चहात आणला गोडवा

सकाळ इम्पॅक्ट : विद्यापीठाच्या परीसरात चहागाडी चालविणाऱ्या सासू- सुनेला मिळाली आपुलकीची भेट

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर विभागासमोरील चहागाडी चालविणाऱ्या आजी शुभांगी पाटील व त्यांच्या सून वैष्णवी पाटील यांना आर्थिक मदत म्हणून पंधरा हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील २००२ च्या  बॕचमधील माजी विद्यार्थ्यांनी दिला. नात सिमरन व धनश्री यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने ही मदत करण्यात आली.


१९९९-२००० मध्ये विद्यापीठाच्या बाहेर गेट नंबर दोन शेजारी फक्त दोन चहागाड्या सुरू होत्या. काशीनाथ व दुसरी अमर पाटील यांची. पाटील कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्यानंतर सर्व जबाबदारी शुंभागी व वैष्णवी पाटील यांच्यावर पडली. चहागाडीवर  संसार गाडा कुठेही न थांबवता या दोघींनी चालवला. सिमरन व धनश्रीचे शिक्षण दोघींनी थांबवले नाही. सिमरन इंजिनिअरिंगला तर धनश्री दहावीला आहे. 

हेही वाचा- सरपंच नितिन पाटील यांच्या प्रतिमेचे पु़जन करून बाबासाहेब खोत यांनी घेतला सरपंच पदाचा पदभार -
याबाबतचे वृत्त 'सकाळ' कोल्हापूर टुडेमध्ये 'फक्कड चहात सासू- सुनेच्या नात्याचा गोडवा' शीर्षकाखाली  प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पेठ वडगांवमधील विजयसिंह यादव कॉलेजचे प्रा. डॉ. सचिन पवार डॉ. सरफराज मुजावर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रदीप कांबळे, प्रा. विजय कोठावळे, डॉ. चिदानंद कनमाडी आणि डॉ. निलेश तरवाळ व त्यांच्या इतर  सहकारी एकत्र आले. त्यांनी १८ हजार रुपयांचा धनादेश मुलींच्या शिक्षणासाठी शुभांगी व वैष्णवी पाटील यांच्याकडे दिला. यावेळी प्रवीण कोडोलीकर, मंदार पाटील, महेश राठोड उपस्थित होते‌.

संपादन - अर्चना बनगे