esakal | कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत वाढ ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

Dakshinadwar ceremony at Datta temple in Nrusinhwadi

दत्त देवस्थानच्या वतीने मंदिरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.

कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत वाढ ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा

sakal_logo
By
जितेंद्र आणुजे

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात आज संततधार पडणाऱ्या पावसामुळे या मौसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोयना धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 24 तासात झपाट्याने तब्बल पंधरा ते सोळा फूट वाढ झाली आहे. तालुक्‍यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दत्त मंदिरात आज सकाळी 11 वाजता कृष्णेचे पाणी आल्याने चालू मौसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा भाविकांविना संपन्न झाला आहे. दत्त देवस्थानच्या वतीने मंदिरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. श्री ची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे.

हे पण वाचाएकनाथ खडसे आमचे नेते  ते पक्ष सोडणार नाहीत ;  चंद्रकांत पाटील  
 
नवरात्रातीत महापूर येण्याची पहिली वेळ
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त दत्त मंदिर परिसरात मंदिराची रंगरंगोटी सुरू होती. मात्र अचानक 15 ते 16 फुट कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्‌याने वाढ झाल्याने मंदिरात तिसऱ्या दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला असला तरी नवरात्रीत महापूर येण्याची ही पहिलीच वेळ असून चालू असलेल्या रंगरंगोटीचे काम आज थांबवल्याचे माहिती देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव पुजारी यांनी दिली.

संपादन - धनाजी सुर्वे