नृत्यांगणा मंगला विधाते-साखरे यांचे निधन 

Dancer Mangala Vidhate passes away
Dancer Mangala Vidhate passes away
Updated on

कोल्हापूर - गावोगावाच्या यात्रा-जत्रांतील कलापथकातून रसिकांची मने जिंकणाऱ्या नृत्यांगणा मंगला विधाते-साखरे (वय 69) यांचे निधन झाले. गेली चाळीस वर्षे बहारदार पदन्यासाने नृत्यपूजा बांधणाऱ्या या नृत्यांगनेला आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आलेला एकाकीपणा मनाला चटका लावणारा ठरला. 

बार्शी तालुक्‍यातील एका गावातून मंगला विधाते कोल्हापुरात आल्या. पंडीत बाबासाहेब मिरजकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले. मुंबईतील एका आघाडीच्या नाट्यसंस्थेत काही वर्षे सहा नाटकात भूमिका बजावल्या. शुध्द भाषा, सुस्पष्ट उच्चारामुळे त्यांनी विविधांगी भूमिकाही साकारल्या. पुढे मराठी चित्रपटात भूमिका व कोरोसमध्येही नृत्यांगणा म्हणून कामे केली. कोल्हापुरात स्थिरावल्यानंतर कलापथक, मेळ्यांव्दारे मराठावाडा, उत्तर महाराष्ट्र, पुणे, मुंबईसह विर्दभात त्यांनी कला सादर करीत त्यांनी नाव कमावले.

पतीच्या निधनानंतर त्या कोल्हापुरात रहात होत्या. वयाच्या साठीनंतरही त्या काही नवोदीत मुलींना नृत्य प्रशिक्षण देत होत्या. मात्र, प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी प्रशिक्षण बंद केले. काही महिन्यापूर्वी त्यांच्या भावाचे निधन झाल्याने त्या एकाकी झाल्या. चार दिवसापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने शहरातील एका कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असताना त्यांचे निधन झाले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com