पंचगंगेत आढळली मृत मगर; मगरीचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे

Dead crocodile found in Panchganga river
Dead crocodile found in Panchganga river

प्रयाग चिखली  (कोल्हापूर) : आंबेवाडी- चिखली दरम्यान पंचगंगा पात्रात आज एक मगर मृतावस्थेत आढळली. वन विभागाने पशुवैद्यकांकडून मगरीचे शवविच्छेदन केले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. 


गेल्या काही वर्षांत मगरीचा नदीपात्रात वावर आहे. गेल्या सहा महिन्यांत पाच वेळा मगरीचे दर्शन झाले आहे. शिवाजी पुलाजवळही वावर आढळला होता. त्यामुळे शेतात जाणारे तसेच पोहायला येणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशात आंबेवाडी- चिखली म्हासोबा माळ परिसरात मगर मृतावस्थेत  तरंगताना आढळली. प्रयाग चिखलीचे बळी कळके, सागर कळके, सुरेश कळके, संदीप कळके, पांडू खोत, अरुणसिंग रजपूत आदींनी मगर पात्राबाहेर काढली आणि वन विभागाला माहिती दिली.

करवीर वन विभागाचे वनपाल विजय पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मगरीला कोठेही जखम नव्हती. खबरदारीचा भाग म्हणून पथकाने नदीसह दोन्ही काठांवर शोध घेतल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मासेमारीच्या जाळ्यात मगर अडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  

मगरीचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे
वन विभागाचे मानद पशुवैद्यक डॉ. वाळवेकर यांनी सांगितले, की मगर तीन वर्षांची पूर्ण वाढ झालेली मादी आहे. तिला कोठेही जखम झालेली नाही. नियमानुसार शवविच्छेदन केले. मगरीचा व्हिसेरा शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेला आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात येणार आहे. त्यानंतर मगरीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.  

संपादन- अर्चना बनगे    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com