...अन् पाच पावलांची ती संयमाची मोहीम यशस्‍वी ; छत्रपतींच्या वीर मावळ्यांना वंदन 

Death anniversary of baji prabhu deshpande
Death anniversary of baji prabhu deshpande

पन्‍हाळा : पन्‍हाळगडावरचा प्रतिवर्षाचा 13 जुलैचा दिवस म्‍हणजे झिम्‍माड पावसाचा.. दाट धुक्‍याचा... "  जय शिवाजी जय भवानी.".. हर ss हर महादेवss  तुमचं आमचं नातं काय "जय  शिवराय जय शिवराय "आदि घोषणांनी गड दुमदुमून जाण्‍याचा..वेगवेगळ्या संस्‍था , मंडळातर्फे हजारो  युवक युवतीनी छत्रपती शिवराय ज्‍या वाटेने पन्‍हाळगडावरून विशाळगडी गेले, त्‍या वाटेवरून पायी जात वीरांच्‍या स्‍म्रुतीना उजाळा  देण्‍याचा.. मावळ्यांच्‍या पराक्रमाची गाथा ऐकण्‍याचा.. पण आज कोरोना संकटामुळे केवळ कोल्‍हापूर जिल्ह्यातीलच नव्‍हे तर राज्‍यातील दुर्गभ्रमंती  आणि गियार्रोहण करणाऱ्या संस्‍था एकत्र आल्‍या, त्‍यांनी सर्वसमावेशक पावनखिंड संग्रामस्‍म्रुती यात्रा मध्‍यवर्ती समन्‍वय समितीची स्‍थापना केली आणि आज प्रतिनिधी मंडळाने नेबापूर हददीतील वीर शिवा काशिद समाधी, चार दरवाजातील पुतळा आणि तीन दरवाजातील बाजी प्रभूंच्या पुतळ्याचे प्रतिकात्‍मक पूजन करून सामा‍जिक हीत जपले. 

समाधीस्‍थळ ते बाजीप्रभू पुतळा या मार्गावर सोशल  डिस्‍टंन्सिंग पाळत, वीरश्रीयुक्‍त पोवाडा गात, त्‍यांला वाद्याऐवजी टाळ्यांची साथ देत वीर मावळ्यांना श्रध्‍दांजली  अर्पण केली. कोणताही गोंगाट गोंधळ नाही.. गडबड नाही.. भाषण नाही..की आरोळ्या नाहीत. अगदी शिस्‍तीत.. तोंडावर मास्‍क वापरत पाच पावलांची ही संयमाची मोहीम यशस्‍वी केली. 

आज सकाळी तहसीलदार रमेश शिंगटे, नगराध्‍यक्षा रुपाली धडेल, वीर शिवा काशिदचे वंशज आनंदा काशिद, बांदल सेनेचे वंशज राजेंद्र बांदल यांच्‍या हस्‍ते समाधीपूजन झाले. यावेळी दुर्गअभ्‍यासक आणि समितीचे प्रमुख डॉ. अमर आडके म्हणाले कोरोनाच्‍या महामारीमुळे हे प्रतिकात्‍मक पूजन करावे लागत आहे, वाटेवरील ग्रामस्‍थांना आपल्‍यामुळे धोका होवू नये म्‍हणून आपणाला हा निर्णय घ्‍यावा लागला आहे. तथापि पुढील काळात एकि‍त्रतपणे  मोठ्या स्‍वरूपात पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करू.  आज 67 संस्‍थांचे प्रतिनिधी या  मोहिमेत सहभागी झाले आहेत. तथापि त्‍यांच्‍या मागील हजारो युवकांनी संयम बाळगत यावर्षी मोहिमा रद्द केल्‍या आहेत. शौर्याच्‍या, त्‍यागाच्‍या ,घैर्याच्‍या या वाटेवर आज संयमाने मात करणार  असल्‍याचे सांगितले.
 बाजीप्रभू  यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  हे  प्रतिनिधी पावनखिंडीकडे वाहनाने रवाना झाले. यावेळी माजी पोलिस पाटील भिमराव काशिद, रविंद्र धडेल, शाहीर आझाद नायकवडी  उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com