डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा भोवला, गर्भवती महिलेला गमवावा लागला जीव: तिघां डॉक्‍टर दांपत्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

डॉक्‍टर दांपत्यावर तिघांवर गर्भवतीच्या मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल

पेठवडगाव (कोल्हापूर)  : निष्काळजीपने व हयगय केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यु झाल्याने डॉक्‍टर पति-पत्नीसह,भुलतज्ञ डॉक्‍टरवर गुन्हा दाखल झाला.ही घटना येथील एसटी स्टॅन्डच्या मागील केळुसकर हॉस्पिटल येथे घडली. ही घटना 19 महिण्यापुर्वी घडली होती. त्यानंतर आज गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी डॉ. यशवंत केळुसकर, त्यांची पत्नी विद्या (रा.पेठवडगाव), भुलतज्ञ डॉ.अनिल शिंदे (रा.कोल्हापुर)यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

सुभाष शंकर पाटील (वय 40, रा.कणेगांव,ता.वाळवा,जि.सांगली) यांची पत्नी अश्‍विनी पाटील गर्भवती होत्या. त्यांना उपचारासाठी डॉ.केळुसकर यांच्या दवाखान्यात दाखवले होते.त्यानंतर गर्भवतीसाठी लागणारे उपचार त्यांच्या दवाखान्यात सुरु होते. त्यांना नऊ महिने पुर्ण झाल्यानंतर 12 मे 2019 ला केळुस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्‍टरांनी तपासणी करुन नॉर्मल डिलीव्हरी होणार नाही. त्यामुळे सिझर करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सिझर ऑपरेशनसाठी त्यांना दाखल केले.

हेही वाचा- Good News: इचलकरंजीकरांनो तुमचा पाणी प्रश्न लागणार मार्गी -

डॉ.यशवंत केळुसकर, भुलतज्ञ डॉ.अनिल शिंदे, सहाय्यक सौ.केळुसकर उपस्थित होत्या. उपचारादरम्यान गर्भवती महिलेची प्रकृती गंभिर बनली. त्यामुळे डॉक्‍टरांनी सीपीआर रुग्णालयात हलवण्यास सांगितले. नातेवाईकांनी या महिलेस सीपीआरमध्ये हलवले.त्यानंतर सीपीआर रुग्नालयात त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान मृतदेहाचे शवविछेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

यावेळी उपचार व्यवस्थित न केल्यामुळे त्या महिलेचा मृत्यु झाल्याचा तज्ज्ञांचा अहवाल काही दिवसापुर्वी आला. त्यानंतर महिलेच्या पतिने फिर्याद दिली. पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a pregnant woman crime case 19 month ago vadgav hatkanangale kolhapur