दिलासादायक : कोल्हापुरात ९४ टक्के बेड रिकामे ; ४४४ जण कोरोनामुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

सहा बाधितांचे मृत्यू; ४४४ कोरोनामुक्त; ७९ बाधित

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी रात्री बारापासून रविवारी रात्री बारापर्यंत फक्त ७९ जण कोरोनाबाधित आढळले. ४४४ जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एकूण ६ बाधितांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरवर मिळून ९४ टक्के बेड रिकामे आहेत.

एकूण बाधितांची संख्या ४७ हजार २९० तर कोरोनामुक्तांची संख्या ४३ हजार ३०९ झाली आहे. आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार ५९४ झाली आहे. जिल्ह्यातील ४० कोवीड सेंटरवर कमीत कमी २ ते १६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये १०९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ९० कोवीड सेंटरमधील ९२ टक्के बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील १४ शासकीय रुग्णालयात दिवसभरात ४०७ व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे. असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा- दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची दुसऱ्या दिवशीची सोहन कमलपुष्पातील पूजा

दृष्टिक्षेपात 
  कोरोनाग्रस्त      ४७ हजार २९०   
  कोरोनामुक्त     ४३ हजार ३०९
  मृत्यू     १ हजार ५९४ 
  उपचार घेणारे बाधित      २ हजार ३८७

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of six covid 19 444 coronal free 79 interrupted