आघाडी सरकाची कर्जमाफी चार गावातील केवळ १७ शेतकऱ्यांच 

सुनील पाटील
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये पाडळी खुर्द, बालिंगा, नागदेववाडी व दोनवडे या चार गावातील केवळ 17 शेतकऱ्यांच लाभ मिळाला आहे. बालिंगा व दोनवडेमधील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे.

बालिंगा : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये पाडळी खुर्द, बालिंगा, नागदेववाडी व दोनवडे या चार गावातील केवळ 17 शेतकऱ्यांच लाभ मिळाला आहे. बालिंगा व दोनवडेमधील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे. तर, या चार ही गावातील विविध संस्थांमध्ये कर्जदार असणाऱ्या 2500 ते 3000 सभासद शेतकऱ्यांपैकी कायम कर्ज बुडविणाऱ्याच 10 थकीत शेतकरीऱ्यांना लाभ मिळाला असल्याने नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी चालू वर्षातील कर्जाची परतफेड करायला तयार नाहीत. 

हे पण वाचा - निव्वळ पांढऱ्या तांबड्यासाठी 55 लाखांची उलाढाल 

महाविकास आघाडीने थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 90 टक्के शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. 
दरम्यान, पाडळी खुर्द, बालिंगा, नागदेववाडी व दोनवडे या गावातील अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांपैकी कायम कर्ज बुडविणाऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ होत आहे. जे शेतकरी आपली पत ठेवणाऱ्या अनेक मार्गाने कर्जाची वेळेत परतफेड करतात. प्रसंगी घरातील दागिने गहाण ठेवून कर्जाची परतफेड करतात. जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्यामाध्यमातून कर्ज घेणाऱ्यापैकी 90 ते 95 टक्के शेतकऱ्यांची कर्ज परतफेड झालेली असते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे चालू खर्च खात्यांचे कर्ज परतफेड करणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे सेवा संस्था, सहकारी व नागरी बॅंकांसह राष्ट्रीयकृत बॅंकांच्या व्यवहारावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडने शक्‍य तेवढ्या लवकर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा लागणार आहे. 

हे पण वाचा - धक्कादायक- मुलांना  मारण्याची धमकी देत केला बलात्कार 

पाडळी खुर्द, बालिंगा, नागदेववाडी, दोनवडे गावातील विविध सहकारी सेवा संस्थे असणार सभासद 
गाव               एकूण      शेतकरी संख्या  कर्जमाफीचे लाभार्थी 
पाडळी खुर्द       810          7 
नागदेववाडी       300         3 
बालिंगा            210        0 
दोनवडे           350        0 

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक गावा-गावात तीन किंवा चारच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होत असल्याचे चित्र आहे. सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे. 
अमित कांबळे, पाडळी खुर्द 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt waiver for only 17 farmers in four villages