तिला नविन नंबरवरून सारखे फोन यायचे, मग तिने...  

लुमाकांत नलवडे
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

मुळची कोल्हापुरातील असलेल्या या तरुणीला हा कॉल आला होता. "महापारेषाण' कंपनीतील भरतीसाठी आलेल्या जाहीरातीमधील एका संकेतस्थळावर या तरुणीने सर्च केले होते. त्यावरून हा कॉल आला असल्याची तिला खात्री झाली आहे. ज्या ठिकाणी अर्ज केला नाही. तेथे नोकरी कशी मिळेल, हा फेक कॉल होता

कोल्हापूर - ""तुमची अपॉईमेंट गारगोटीत झाली आहे. तुम्ही हजर का झाला नाही ? रद्द झालेली ऑर्डर पुनरर्जिवीत करण्यासाठी 3 हजार 180 रुपयांचा स्टॅंप करा, पिंपरी चिंचवडच्या पोलिस ठाण्याजवळ भेटा.'' 

मुळची कोल्हापुरातील असलेल्या या तरुणीला हा कॉल आला होता. "महापारेषाण' कंपनीतील भरतीसाठी आलेल्या जाहीरातीमधील एका संकेतस्थळावर या तरुणीने सर्च केले होते. त्यावरून हा कॉल आला असल्याची तिला खात्री झाली आहे. ज्या ठिकाणी अर्ज केला नाही. तेथे नोकरी कशी मिळेल, हा फेक कॉल होता, याची तिला खात्री झाली. त्यामुळे तिने दुर्लक्ष केले. मात्र आता वारंवार वेगवेगळे फोन येत आहेत. मॅसेज येत आहेत. त्यामुळे तिला तिचा मोबाइल क्रमांक बंद करावा लागला आहे. 
मुळची कोल्हापूरची असलेली मुलगी पुण्यात शिकते. नोकरीची आवश्‍यकता असल्यामुळे तिने मित्रांकडून मोबाइलवर मिळालेल्या जाहिरातीच्या पीडीएफ फाईलवरील संकेतस्थळावर भेट दिली. सविस्तर जाहिरात न वाचताच संकेतस्थळावर माहिती भरण्याचे काम सुरू केले. प्रत्यक्षात ती खुल्या गटातील असल्यामुळे ती अपात्र होती. त्यामुळे तिने अर्ज दाखल केला नाही. तरीही चार दिवसापूर्वी ता तरुणी कॉल आला. या कॉलवर त्या तरुणीचे नाव, पत्ता, शिक्षण, घरची स्थिती इतर माहिती सांगण्यात आली. यावरून फोन करणाऱ्याला तरुणीची सर्व माहिती असल्याचे स्पष्ट झाले. यावर त्याने काल तुम्ही गारगोटीत हजर होणार होता. का झाला नाही? अशी विचारणा केली, यावर तरुणीने याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. आणि फोन बंद केला. क्षणात तरुणीला कळून चुकले की आपण अर्जच केला नाही, तरीही नोकरी कशी मिळेल ? हा फेक कॉल असल्याचे तिला समजले. नेमका काय प्रकार आहे, फसवणूक कोण करतोय याची माहिती घेण्यासाठी तरुणीने त्याला परत कॉल केला. 

हे पण वाचा -  महावितरणचा प्रामाणिकांना शॅाक; तर धनिकांवर फिदा

यावेळी ऑर्डर पुनरज्जिवीत करण्यासाठी तुम्हाला 3 हजार 180 रुपयांचा स्टॅंम्प करावा लागेल, असे सांगितले. यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याजवळ जावा. तेथे "प्रियांका' नावाची मुलगी तुम्हाला भेटेल. ती तुम्हाला स्टॅम्प करून देईल, असे सांगितले. मात्र भितीने या तरुणीने तेथे जाणे टाळले. 

दरम्यान ऑनलाईनवर पैसे देण्यासाठी फोन करणाऱ्याने "पोळ' नावाच्या तरुणाचा अकाऊंट नंबर दिला होता. तोही मोटारींच्या कंपनीत अग्रेसर असलेल्या नावाशी साधर्म्य असलेल्या बॅकेतील होता. आयएफएससी कोड ही दिला होता. येथे तरुणीने पैसे पाठविले नाहीत. याचवेळी ही माहिती मित्र- नातेवाईकांना दिली. त्यांनी संबंधित तरुणीला कॉल करणाऱ्या व्यक्तीला फोनवरून चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर संबंधिताचा फोन बंद आहे. याबाबत महापारेषा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर असा कोणताही कॉल आम्ही करत नाही. परीक्षा, वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय अपाईमेंट मिळत नाही. अशा फेक कॉलवर विश्‍वास ठेवू नये, असे स्पष्ट केले. 

हे पण वाचा - तुम्ही तुमच्या गाडीचा विमा उतरविला आहे का? नसेल तर ही बातमी वाचा 

पोलिसाकडून चौकशीची गरज 
दोन दिवसापूर्वीपासून संबंधित तरुणीला वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येते आहेत. हे फोन परदेशातील असल्याच्या संशयावरून तरुणीने घेतले नाहीत. त्यानंतर तिला मॅसेज येऊ लागले आहेत. विनाकारण मनस्ताप होत आहे. म्हणून तिने तिचा मोबाइल क्रमांक बंद ठेवावा लागत आहे. स्थानिक पोलिसांनी याची चौकशी केल्यास नक्कीच फसवणूक करण्यांच्या मुसक्‍या आवळल्या जातील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deception for young ladies in kolhapur