तुम्ही तुमच्या गाडीचा विमा उतरविला आहे का? नसेल तर ही बातमी वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Without insurance the vehicle will be confiscated

खानापूर तालुक्‍यातील बोगूरजवळ ट्रॅक्‍टर पुलावरून नाल्यात कोसळून सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस खाते खडबडून जागे झाले आहे.

तुम्ही तुमच्या गाडीचा विमा उतरविला आहे का? नसेल तर ही बातमी वाचा

बेळगाव - बोगूरमध्ये ट्रॅक्‍टर पुलावरुन कोसळून झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत खानापूर तालुक्‍यातील बहुतांश वाहनांचा विमाच उतरविला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, आता खानापूर पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारी (ता. २४) मलप्रभा क्रीडांगणावर विमा मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानंतर विमा नसलेली वाहने थेट जप्त करण्यात येतील. त्यामुळे, २४ फेब्रुवारीपर्यंत वाहनमालकांनी विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

खानापूर तालुक्‍यातील बोगूरजवळ ट्रॅक्‍टर पुलावरून नाल्यात कोसळून सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस खाते खडबडून जागे झाले आहे. अपघातग्रस्त टॅक्‍टरचा विमा नव्हताच, त्यातच चालकाकडेही वाहन परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे, मृतांच्या वारसांना विमा संरक्षणापासूनच मुकावे लागेल. या घटनेची पोलिस खात्याने गंभीर दखल घेतली आहे. तालुक्‍यात धावणाऱ्या बहुतांश वाहनांवर विमा उतरविला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सोमवारी मलप्रभा क्रीडांगणावर भव्य विमा मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

वाचा - Mahashivratri 2020 : कोल्हापूरच्या प्राचीनतेचे साक्षीदार महादेव मंदिरांचे अस्तित्व आजही ठळक... 

मेळाव्याला विविध तीन विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. वाहनमालक हवी ती कंपनी निवडून विमा उतरवू शकतात. आयएसआय प्रमाणीत हेल्मेटही कमी दरात विक्री केले जाणार आहेत. तसेच नंबरप्लेट बनविण्यासाठी रेडियम विक्रेते व पेंटर असणार आहेत. यावेळी आरटीओ अधिकारीही उपस्थित राहतील. विमा नसलेल्या वाहनमालाकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा. अन्यथा विमा नसलेली वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा पोलीस खात्याने दिला आहे. 

ऊसतोड मजुरांची वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर बोगूरजवळ नाल्यात कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रॅक्‍टरचा विमा उतरविला नव्हता. तसेच चालकाचा परवानाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तालुक्‍यात धावणाऱ्या बहुतांश वाहनांचाही विमा नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २४ फेब्रुवारीनंतर विमा नसलेली वाहने जप्त केली जाणार आहेत.
- मोतीलाल पवार, पोलिस निरीक्षक, खानापूर

Web Title: Without Insurance Vehicle Will Be Confiscated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurInsurance