अकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम

कोल्हापूर :  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर अजूनही भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र, सर्व सुरक्षिततेचे नियम पाळत अकराशे भाविकांना घरपोच प्रसाद पाठवण्यात आला. 

श्री अंबाबाईला खीरीचा प्रसाद अर्पण केल्यानंतर "फटाफट' या डिलीव्हरी कंपनीचे केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस रायडर्सच्या माध्यमातून हा प्रसाद पोच करण्यात आला. कोरोनामुळे बदलत्या काळानुसार बदलत्या तंत्राचा आधार घेत यंदा भाविकांना प्रसाद घरपोच करण्याचा भक्त मंडळाने निर्णय घेतला आणि त्याला भाविकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला, असे मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.

हेही वाचा- पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले, नवनाथ घोगरेंची बदली -

यावेळी ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी, हर्षदा मेवेकरी, अमित जाधव, राजेश सुगंधी, सुनील खडके, प्रशांत तहसीलदार, तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी, अतिष जाधव, आसावरी जोशी, रविंद्र फलटणकर आदी उपस्थित होते.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delivered to eleven hundred devotees Prasad on the same day